Home /News /crime /

पतीची लैंगिकता संपविण्यासाठी प्रियकरासोबत रचलं कारस्थान; पहाटे रक्ताळलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

पतीची लैंगिकता संपविण्यासाठी प्रियकरासोबत रचलं कारस्थान; पहाटे रक्ताळलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

तब्बल 20 वर्ष लहान पत्नीने प्रियकराच्या मदतीने धक्कादायक कृत्य केलं. यात तरुणीच्या पतीचा मृत्यू झाला.

    मैसूर, 22 जुलै: कर्नाटक (Karnataka) मधील मैसूर (Mysuru) येथून एक हैराण करणारं वृत्त समोर आलं आहे. येथील एका महिलेने आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट (Woman Cut His Husband's Private Part) कापून टाकला. ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. प्रियकरासोबत मिळून केलं कारस्थान द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, आरोपी महिलेने आपल्या पतीसोबत मिळून पतीचा प्रायव्हेट पार्ट (Private Part) कापण्याचं कारस्थान केलं. आरोपी महिलेचं नाव उमा असल्याचं समोर आलं आहे. पतीच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. पीड़ित एचटी वेंकटराजू याच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये (Postmortem Report) प्रायव्हेट कापल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. हे ही वाचा-प्रेम प्रकरण आर्मी जवानाच्या अंगाशी; पहिली पत्नी असतानाही दुसऱ्या लग्नाचा घाट आरोपी महिलेची चौकशी सुरू सांगितलं जात आहे की, पीडित वेंकटराजू ग्रुप डीचा कर्मचारी होता. तो एका वेयरहाऊस कॉर्पोरेशनमध्ये काम करीत होता. पोलिसांनी (Police) आरोपी उमाला अटक केली आहे आणि तिची चौकशी सुरू आहे. पोलिसांना प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, उमाचं वय तिच्या पतीपेक्षा 20 वर्षांनी कमी आहे. त्यांना दोन मुलं देखील आहेत. 10 वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं होतं. मात्र उमा या लग्नात खूश नव्हती. तिचं अविनाश नामक तरुणावर प्रेम होतं. अविनाश तिच्या माहेरील घराजवळच राहत होता. अविनाशसोबत प्रेम असल्यामुळे उमा गेल्या चार वर्षांपासून पतीच्या घरी गेलीच नव्हती. त्या दिवशी नेमकं काय झालं? 9 ऑक्टोबर 2020 रोजी उमा आपल्या सासरी गेली आणि पतीला कॉफीमध्ये नशेचं औषधं दिलं. ज्यानंतर उमाने धारदार हत्याचाराने पतीचं प्रायव्हेट पार्ट कापला. पतीच्या मृत्यूनंतर मात्र तिने खोटी बातमी पसरवली की, झोपेत पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मात्र 9 महिन्यांनंतर आता पोलिसांना नेमका छडा लागला आहे. आता त्यांनी उमाला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Karnataka, Murder, PRIVATE part

    पुढील बातम्या