मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! जीन्स घालते म्हणून काकानं केला पुतणीचा खून, आजोबांनीही दिली साथ

धक्कादायक! जीन्स घालते म्हणून काकानं केला पुतणीचा खून, आजोबांनीही दिली साथ

लहानपणापासून शहरात राहिलेली मुलगी गावात राहायला आल्यावरदेखील जीन्स (Jeans) घालणं बंद करत नाही, म्हणून चुलत्याने पुतणीचा खून (Uncle killed Niece) केला आहे.

  • Published by:  desk news

लखनौ, 22 जुलै : लहानपणापासून शहरात राहिलेली मुलगी गावात राहायला आल्यावरदेखील जीन्स (Jeans) घालणं बंद करत नाही, म्हणून चुलत्याने पुतणीचा खून (Uncle killed Niece) केला आहे. मुलींनी जीन्स घालणं मान्य नाही, असं सांगत या काकाने पुतणीला अऩेकदा ताकीद दिली. मात्र तरीही पुतणीने काकाला न जुमानता जीन्स घालणे सुरुच ठेवले. याचा राग येऊन काकाने पुतणीला जबर मारहाण केली. या मारहाणीत मुलीच्या आजोबांनीदेखील (grandfather) काकाला साथा दिली. दोघांनी केलेल्या मारहाणीदरम्यान भिंतीवर डोकं आपटून या मुलीचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशातील देवरिया भागात ही घटना घडली. मुलीचे वडिल लुधियानात नोकरी करत असल्यामुळे ही मुलगी आपल्या आईवडिलांसोबत शहरात राहत होती. मात्र सध्या कोरोनाकाळात हे कुटुंब गावी आलं होतं. शहराप्रमाणे गावात जीन्स घालून फिरण्याला मुलीच्या काकाचा विरोध होता. यावरून त्या मुलीमध्ये आणि काकामध्ये अऩेकदा वादावादीही होत असे. हा राग मनात ठेऊन काकानं आणि मुलीच्या आजोबांनी तिला मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला.

मृतदेह फेकण्याचा प्रयत्न

आपला गुन्हा लपवण्यासाठी या दोघांनी तो मृतदेह गावाबाहेर नेऊन नदीत फेकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह खाली फेकत असताना मुलीचा पाय रेलिंगमध्ये अडकला आणि मृतदेह नदीच्या पुलावर लटकू लागला. त्यानंतर आपला गुन्हा उघडकीला येईल, या भीतीने दोघांनी तिथून पळ काढला. आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस या मुलीचा शोध घेत होते. पोलिसांना दोनच दिवसात हा मृतदेह नदीच्या पुलावर लटकत असल्याचे आढळून आले आणि खुनाचा उलगडा झाला.

हे वाचा -पुरातील मनोरुग्णाची तीन तासांच्या थरारानंतर SDRF कडून सुटका, पाहा Photos

पोलिसांमध्ये वाद

नदीच्या ज्या पुलावर मृतदेह लटकला, त्यातला अर्धा भाग एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो, तर उरलेला अर्धा वेगळ्या पोलीस ठाण्याच्या. त्यामुळे ही केस कुठल्या पोलीस स्टेशनने घ्यायची, यावरून जोरदार वाद रंगला. काही मिनिटांच्या या वादानंतर वरिष्ठांच्या मध्यस्थीने हा वाद सुटला आणि काका – आजोबा या गुन्हेगार जोडीला अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

First published: