इंदूर, 12 डिसेंबर: आपल्या पत्नीला (Wife) माहेरातून सासरला येऊ देत नसल्याच्या रागातून जावयानेच (Son in law) सासऱ्याचा (Father in law) खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पती (Family dispute) आणि पत्नीचं भांडण झाल्यानंतर पत्नी माहेरी येऊन राहिली होती. तिची समजूत काढून तिला पुन्हा घरी नेऊन जाण्याचा प्रयत्न पती करत होता. मात्र मुलीचे वडील तिला सासरी सोडायला नकार देत होते. याचा राग मनात धरून जावयानेच सासऱ्याचा काटा काढला.
घरगुती वाद
मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये राहणाऱ्या मुकेशचं 12 वर्षांपूर्वी नाहर सिंह यांची मुलगी भुरी हिच्यासोबत झालं होतं. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्यात वाद सुरू झाले. किरकोळ कारणावरून होणाऱ्या भांडणांनी उग्र स्वरूप धारण केलं आणि दोघांची ताटातूट झाली. रागाच्या भरात पत्नी भुरी सासर सोडून माहेरी राहायला आली.
पत्नीला समजावण्याचा प्रयत्न
राग शांत झाल्यानंतर आपल्या पत्नीला पुन्हा घरी घेऊन येण्यासाठी मुकेश तिच्या माहेरी पोहोचला. मात्र आपल्या मुलीला घेऊन जाण्यास सासऱ्यांनी नकार दिला. त्यानंतर वारंवार मुकेशने सासूरवाडीत जाऊन आपल्या पत्नीला समजावण्याचा आणि तिला घरी परत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रत्यत्नात आपला सासरा अडथळा ठरत असल्याचं लक्षात आल्यावर त्यांचा काटा काढण्याचा निर्णय मुकेशनं घेतला.
असा केला खून
आपल्या दोन साथीदारांसह मुकेश पत्नीला घरी नेण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यासाठी सासूरवाडीत गेला. त्याने पत्नीला सोबत चलण्याची सूचना केली. मात्र यावेळी पुन्हा तिच्या वडिलांनी मध्यस्थी करत मुलीला सासरी पाठवायला नकार दिला. त्यावर संतापलेल्या मुकेशनं त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीनं सासऱ्यावर चाकूनं वार केले.
हे वाचा- ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक
पोलीस तपास सुरू
मुकेशनं केलेले चाकूचे वार वर्मी लागल्यामुळे सासरे नाहर सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर मुकेश आणि त्याचे दोन साथीदार फरार झाले. पोलिसांनी वेगवेगळी पथकं करून त्यांचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली. मुकेशसह इतर दोघांवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Marriage, Murder, Police, Wife and husband