मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक

ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक

लंडन ऑलिम्पिकमध्ये (London Olympics 2012) 2 गोल्ड मेडल जिंकणाऱ्या दिग्गज खेळाडूला बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

लंडन ऑलिम्पिकमध्ये (London Olympics 2012) 2 गोल्ड मेडल जिंकणाऱ्या दिग्गज खेळाडूला बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

लंडन ऑलिम्पिकमध्ये (London Olympics 2012) 2 गोल्ड मेडल जिंकणाऱ्या दिग्गज खेळाडूला बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

मुंबई, 12 डिसेंबर :  एखाद्या देशाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारा खेळाडू हा त्यांचा प्रतिनिधी असतो. त्यातच त्याने ऑलिम्पिक स्पर्धेत (Olympic Games) गोल्ड मेडल जिंकलेलं असेल तर त्या देशातील अनेकांचा रोल मॉडेल बनतो. त्यामुळे या ऑलिम्पिकपटूने एखादे गुन्हेगारी कृत्यू केले की त्याचा बसणारा धक्का हा मोठा असतो. युरोपातील फ्रान्स (France) देशालाही असाच फटका बसला आहे.

फ्रान्सचा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट स्विमर यानिक एंजल (Yanik Angel) याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याला पॅरीसमध्ये अटक करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी शनिवारी सुरू झाली आहे. यानिकवर 15 वर्षांच्या अल्पवयीन व्यक्तीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

यानिकनं लंडनमध्ये 2012 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 2 गोल्ड मेडल जिंकली होती. त्याने 2014 साली मेलहाऊस स्विमिंग क्लबमध्ये प्रवेश केला होता. या क्लबचा तो दोन वर्ष सदस्य होता. याच काळात हे प्रकरण घडल्याचा आरोप आहे. फ्रान्समधील हा क्लब यापूर्वीही वादग्रस्त ठरला आहे.  या क्लबमधील सदस्यांवर फसवणुकीचे आरोप यापूर्वी झाले आहे. या प्रकरणात अनेक आजी आणि माजी सदस्यांची चौकशी करण्यात आली आहे.

क्लास बंक करुन विद्यार्थ्यांची पबमध्ये पार्टी, डान्सचा अश्लील VIDEO व्हायरल होताच कॉलेजनं उचललं मोठं पाऊल

29 वर्षांच्या यानिकने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरूवात 2010 साली केली होती. त्यावर्षी झालेल्या युरोपीयन चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने 400 मीटर फ्री स्टाईल गटात गोल्ड मेडल मिळवले होते. त्यानंतर दोन वर्षांनी झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने सर्वोत्तम खेळ केला. या ऑलिम्पिकमध्ये त्याने 200 मीटर आणि 4 बाय 100 मीटर फ्री स्टाईल गटात गोल्ड मेडल जिंकले होते. त्याचबरोबर त्याने 4 बाय 200 मीटर स्पर्धेत सिल्व्हर मेडलची कमाई केली होती. त्याचबरोबर 2013 साली झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये यानिकनं 2 गोल्ड मेडल जिंकले होते.

First published:
top videos

    Tags: Crime news, Olympic, Rape case