• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • सणकी तरुणाचा आईवडिलांवरच हल्ला, जमिनीच्या वादातून घातल्या गोळ्या

सणकी तरुणाचा आईवडिलांवरच हल्ला, जमिनीच्या वादातून घातल्या गोळ्या

जमिनीच्या वादातून (Son fired on his parents in land dispute) सणकी तरुणाने आपल्याच आईवडिलांना गोळ्या घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 • Share this:
  भोपाळ, 17 नोव्हेंबर: जमिनीच्या वादातून (Son fired on his parents in land dispute) सणकी तरुणाने आपल्याच आईवडिलांना गोळ्या घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून वडिलांसोबत झालेल्या भांडणानंतर या सणकी तरुणाने (Crime in land dispute) स्वतःकडे असणाऱ्या बंदुकीतून वडिलांवर आणि आईवर तुफान गोळीबार केला. यात त्याचे आईवडील (Parents injured in firing) गंभीर जखमी झाले. जमिनीवरून झाला वाद मध्यप्रदेशातील रिवा परिसरात राहणाऱ्या अंबिका पांडेय यांची वडिलोपार्जित जमीन आहे. त्यांचा मुलगा अभिषेक पांडेय यानं काही दिवसांपूर्वीच सैन्यातील नोकरी सोडली होती आणि जमिनीवरून तो वडिलांसोबत वाद घालत होता. जमिनीची वाटणी करून आपल्या वाट्याची जमीन आपल्या नावे करून द्यावी, अशी त्याची मागणी होती. ही मागणी वडिलांना मान्य नव्हती. जमिनीचे वाटे करायला त्याचे वडील तयार नव्हते. घटनेच्या दिवशी याच मुद्द्यावरून वाद झाला आणि संतापलेल्या अभिषेकने वडील अंबिका पांडेय यांना त्याच्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. बंदुकीतील छर्रे लागल्यामुळे त्याची आईदेखील गंभीर जखमी झाली. शेजाऱ्यांनी केली मदत गोळीबाराचे आणि भांडणाचे आवाज ऐकून शेजारी ज्यावेळी पांडेय कुटुंबाच्या घरी धावत आले, तेव्हा पांडेय कुटूंब रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं त्यांना दिसलं. अभिषेक हा आईवडिलांना शिव्या घालत होता आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देत होता. शेजारी आल्यावर मात्र तिथून तो पळून गेला. शेजाऱ्यांनी अंबिका आणि त्यांच्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. दोघांवरही सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. हे वाचा- पाकिस्तानमध्ये Team India चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला जाणार? खेळ मंत्री म्हणाले... मुलाने सोडली होती नोकरी अभिषेक पांडेय याने तीन वर्षांपूर्वीच सैन्यातील त्याची नोकरी सोडली होती. सध्या बेकार असलेल्या अभिषेकला त्याच्या वडिलांच्या नावे असणाऱ्या जमिनीचा वाटा हवा होता. तर आपल्या मुलाने पुन्हा सैन्यात जाऊन नोकरी करावी, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. याच वादातून मुलाने वडिलांवर गोळ्या झाडल्या. या प्रकरणी पोलिसांनी फरार झालेल्या अभिषेकला शोधून त्याला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
  Published by:desk news
  First published: