मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! लाईव्ह येत 25 वर्षीय सोशल मीडिया स्टारनं घेतलं विष, मग स्वतःच रुग्णवाहिकाही बोलावली पण...

धक्कादायक! लाईव्ह येत 25 वर्षीय सोशल मीडिया स्टारनं घेतलं विष, मग स्वतःच रुग्णवाहिकाही बोलावली पण...

आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये लुओनं स्वतः सांगितलं होतं की कदाचित हा तिचा शेवटचा व्हिडिओ आहे. कारण मागच्या बऱ्याच काळापासून ती डिप्रेशनचा (Long Depression) सामना करत आहे

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 21 ऑक्टोबर : इंटरनेटची दुनिया इतकी अजब आहे, की इथे अनेक अशा घटना घडतात ज्या विचारांपलिकडील असतात. जे लोक सोशल मीडियावर (Social Media) तुमचे मित्र आहेत, त्यांनाही तुमची काळजी नसते. जे तुम्हाला फॉलो करतात त्यांनाही कदाचित तुमच्या मृत्यूमुळे काहीही फरक पडत नाही. हे आम्ही आज यासाठी सांगत आहोत, कारण एका चिनी सोशल मीडिया स्टारला (Chinese Social Media Influencer) लाईव्ह स्ट्रिमिंगदरम्यान तिच्याच फॉलोअर्सनं किटकनाशक पिण्यासाठी प्रवृत्त केलं आणि यानंतर या तरुणीचा मृत्यू झाला. सोसायटीत दाराची कुणी तरी लावत होतं कडी, जाब विचारला तर शेजाऱ्याने केला चाकूने हल Daily Star च्या रिपोर्टनुसार, लुओ शाओ माओ माओ जी (Luo Xiao Mao Mao Zi) हिचा लाईव्ह स्ट्रिमिंगदरम्यानच किटकनाशक पिल्याने दुर्देवी मृत्यू (Suicide During Live Streaming) झाला. १४ ऑक्टोबरला लुओसोबत ही घटना घडली. याच्या दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. लुओ डुओयिन नावाच्या चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टार होती. आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये लुओनं स्वतः सांगितलं होतं की कदाचित हा तिचा शेवटचा व्हिडिओ आहे. कारण मागच्या बऱ्याच काळापासून ती डिप्रेशनचा (Long Depression) सामना करत आहे. २ महिने ती रुग्णालयातही होती. लुओनं असंही म्हटलं की ती कोणतं प्रोडक्ट विकण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाहीये. तिनं आपल्या हातात किटकनाशकाची बाटली घेतली होती आणि ती लाईव्ह करत होती. इंटरनेटवर तिचे लाखो फॉलोअर्स होते, ज्यांच्यासाठी ती वेगवेगळा कंटेट टाकत असे. मौलानाकडून 6 वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार; वर्ध्यातील खळबळजनक घटना लुओच्या एका जवळच्या मित्रानं दिलेल्या माहितीनुसार, ती आपल्या बॉयफ्रेंडमुळे मागील काही महिन्यांपासून डिस्टर्ब होती. त्यादिवशीही तिचा उद्देश किटकनाशक पिऊन आत्महत्येचा नव्हता. तर, ती केवळ आपल्या बॉयफ्रेंडचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होती. विष पिल्यानंतर तिनं स्वतःच रुग्णवाहिका बोलावली होती. मात्र, तोपर्यंत किटकनाशकानं आपलं काम केलं होतं. जेव्हा तिनं लाईव्ह जात पेस्टिसाईट पिलं, तेव्हा हजारो फॉलोअर्स तिला पाहत होते. लुओचे डुओयिनवर 6 लाख 70 हजारहून अधिका फॉलोअर्स होते. मात्र, त्यावेळी कोणीही तिला हे भयंकर पाऊल उचलण्यापासून थांबवलं नाही.
First published:

Tags: Crime news, Depression, Live video, Social media

पुढील बातम्या