मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, कापडी पिशवीतून 40 लाखांचे चरस विकणाऱ्याला अटक

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, कापडी पिशवीतून 40 लाखांचे चरस विकणाऱ्याला अटक

 वाडीबंदर भागात अनेक ट्रक गोदामे आहेत. याचाच फायदा घेवून आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करतात.

वाडीबंदर भागात अनेक ट्रक गोदामे आहेत. याचाच फायदा घेवून आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करतात.

वाडीबंदर भागात अनेक ट्रक गोदामे आहेत. याचाच फायदा घेवून आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करतात.

मुंबई, 16 जानेवारी : मुंबईत  (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थ तस्करीची घटना वारंवार समोर येत आहे. कोण कुठे कधी अंमली पदार्थांची तस्करी करत असेल याचा नेम नाही. मुंबईतील वाडी बंदर भागात चरसची तस्करी करत असताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत 40 लाख किंमतीचे चरस जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जानेवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास आझाद मैदान अंमली पदार्थ विरोधी पथकाचे काही अधिकारी पी डिमेलो रोडवरील वाडीबंदर येथे गस्त घालत होते. कारण वाडीबंदर भागात गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थ तस्करीचे प्रमाण वाढले होते. वाडी बंदर भागात डाॅक आहेत, शिपयार्ड आहेत. आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय जल वाहतूक इथून होत असते. तसंच जल वाहतुकीमार्गे आलेले सामान विविध ठिकाणी पोहोचवण्यासाठी या वाडी बंदर भागात अनेक ट्रक गोदामे आहेत. याचाच फायदा घेवून आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करतात. या करता तस्कर या वाडी बंदर भागात राहणाऱ्या गोरगरिबांचा आणि सतत व्यसनाधीन असलेल्यांचा वापर करतात.  त्यांच्याकडे पाहून पोलिसांना ते अंमली पदार्थांची देवाण घेवाण करतायेत किंवा तस्करी करत आहे असा संशय येणार नाही.

मोडून पडला संसार पण...! सर्वकाही गमावल्यानंतर 100 रुपयात उभारला व्यवसाय

हीच अंमली पदार्थ तस्करीची पद्धत वापरुन 11 जानेवारीच्या रात्री याच वाडीबंदर भागात 42 वर्षीय एक व्यक्ती हातात जांभळ्या रंगाची पिशवी घेवून अगदी आरामात जात होता. आश्चर्य म्हणजे, या वाडीबंदर भागात सतत वाहतूक कोंडी होत असते म्हणून वाहतूक पोलीस असतात कोणालाच त्याचा संशय आला नाही आणि तो रमत गमत हातात पिशवी घेवून जात होता आणि चालत चालत तो एका कोपऱ्यात उभा असलेल्या 24 वर्षीय तरुणाला ती पिशवी देत होता. मात्र, याच वेळी मुंबई पोलिसांच्या आझाद मैदान अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी याच वाडी बंदर भागात गस्त घालत होते. त्यांनी पाहिले एका कोप-या दोन व्यक्ती पिशव्यांची अदला बदल करत आहेत. त्यांनी लगेच त्या दोघांकडे धाव घेत त्या जांभळी पिशवी सहित त्या दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली. पिशवीत 1 किलो 200 ग्राम वजनाचा पांढरा पदार्थ होता. ज्याला चरस म्हणतात. त्या दोघांना  तात्काळ पोलीस स्टेशनला घेवून गेले आणि त्यांची कसून चौकशी केली. ज्यात हे दोघे आंतरराज्य अंमली पदार्थ टोळीचे तस्कर असल्याचे स्पष्ट झाले.

हार्दिक आणि कृणाल पांड्याला घडवणाऱ्या बापाची कहाणी!

जप्त केलेल्या 1 किलो 200 ग्राम चरसची बाजारात किंमत तब्बल ४० लाख रुपये आहे. तर अटक केलेल्या 42 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे धर्मेंद्र मिश्रा आणि 24 वर्षीय तरुणाचे नाव  राहुल शर्मा आहे. दोघंही सध्या मुंबई पोलिसांच्या आझाद मैदान अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कोठडीत आहेत. त्यांनी हे अंमली पदार्थ कुठून आणले याबाबत मुंबई पोलिसांची आझाद मैदान अंमली पदार्थ विरोधी पथक तपास करत आहे. या कारवाईचे पोलीससह आयुक्त गुन्हे मिलिंद भारंबे, अप्पर पोलीस आयुक्त विरेश प्रभू आणि पोलीस उपायुक्त दता नलावडे यांनी आझाद मैदान युनीटचे प्रभारी निरीक्षक दत्तात्रय मसवेकर पवार, चव्हाण, इघे, निंबाळकर यांचे कौतुक केले आहे.

First published:

Tags: Smuggling