नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : उन्हाळ्याच्या दिवसात तर एसी हा अनेकांना वरदान वाटतो. मात्र अनेकदा यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशीच एक घटना तमिळनाडूतील चेन्नईतून समोर आली आहे. येथे एक व्यक्ती रात्री एसी लावून झोपला होता, सकाळी पाहिलं तर तो मृतावस्थेत दिसला. या घटनेनंतर तरुणाचा जळालेला मृतदेह सापडला. ही घटना तमिळनाडूतील चैन्नई येथील थिरुविका भागातील आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ही घटना रविवारी रात्री घडली. तरुण एसी सुरू करून झोपला होता. त्याचदरम्यान अचानक एसीचा स्फोट झाला आणि यात तरुण संपूर्ण जळाला. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आपल्या खोलीत झोपलेला असतानाच दुर्देवीपणे त्याचा मृत्यू झाला. तळमजल्यावरील एका खोलीत हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकताच पहिल्या मजल्यावरील तरुणाने वडील धावत धावत तेथे पोहोतले. ते पोहोचेपर्यंत खोलीत आग लागली होती. त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला बोलावलं. तोपर्यंत तरुणाचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोहोचलेले अग्निशमन आणि बचाव दलाने सांगितलं की, शॉर्ट सर्किटमुळे एसीमध्ये स्फोट झाला. सध्या पोलिसांकडून तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुण स्थानिक भागात दुधाचं दुकान चालवत होता. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.