नागपूर, 13 ऑगस्ट : नागपूरात एका विद्यार्थ्याने आपल्या कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी विद्यार्थी पेट्रोल प्यायला होता. यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मिळालेल्या माहितीनुसार शिवम मोरेश्वर कातरे (19) याने आपल्या सेमिनारी हिल्स स्थित कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. शिवम हा बीसीएच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. ही घटा सकाळी 11.30 वाजता घडल्याचं सांगितलं जात आहे. जीन्सने संपवलं 7 जन्माचं नातं, पतीने कपड्यांवरून टोकलं आणि घात झाला… शिवमने कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारण्यापूर्वी 200 ml पेट्रोल प्यायला होता. रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. कॉलेज प्रशासनाने शिवमच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. याबाबत शिवमच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांच्या मुलाचं कोणाशी शत्रूत्व नव्हतं. याशिवाय त्याला कसला त्रासही नव्हता. तर दुसरीकडे शिवमच्या मित्रांनी सांगितलं की, शिवम गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. यातूनच त्याने आत्महत्येचं पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला नाही. त्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण कळेल, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.