नवी दिल्ली 03 डिसेंबर : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आफताबने ज्या शस्त्राने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते ते शस्त्र पोलिसांना सापडले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान असं आढळून आलं आहे की, आफताबने श्रद्धाच्या शरीराचे चायनीज चॉपरने तुकडे केले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने आधी श्रद्धाच्या हाताचे तुकडे केले होते. नार्को टेस्टमध्ये त्याने सांगितलं, की ज्या छोट्या करवतीने त्याने श्रद्धाचे तुकडे केले होते, ती कुठे फेकली. पोलीस आता त्या ठिकाणी त्या शस्त्राचा शोध घेत आहेत.
आफताबच्या फ्लॅटमधून अनेक धारदार शस्त्रे जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याच शस्त्रांनी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. आफताबने हे चॉपर कुठून आणलं होतं, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
श्रद्धा वालकर हत्याकांड: तुरुंगात दिवसरात्र काय करतो आफताब? पाहून अधिकारीही चक्रावले
याशिवाय ही शस्त्रे 18 मे पूर्वी खरेदी केली होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत. हत्येपूर्वी हत्यारे विकत घेतल्याचे सिद्ध झाल्यास आफताबने कट रचून हत्या केल्याचेही सिद्ध होईल. आफताब वारंवार हेच सांगत आहे, की त्याने रागात श्रद्धाची हत्या केली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने अनेक महिने श्रद्धाचा मोबाईल फोन जवळ ठेवला होता. मुंबई पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले तेव्हा श्रद्धाचा मोबाईल फोन त्याच्याकडेच होता, नंतर त्याने तो फोन मुंबईतील समुद्रात फेकून दिला.
पॉलीग्राफनंतर आफताबची नार्को टेस्टही फेल? नवे खुलासे केले पण..., आता हा असेल पोलिसांचा पुढचा प्लॅन
श्रद्धा वालकर खून प्रकरणात आफताबला अनेक तास चौकशीला सामोरे जावे लागले. त्याची पॉलीग्राफी झाली आणि नंतर नार्को टेस्ट... प्रत्येक वेळी त्याने हुशारीने तयार केलेली उत्तरे दिली. आतापर्यंतच्या तपासात त्याच्याकडून काही नवीन माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही. चौकशीदरम्यान तो नेहमी शांत दिसला. त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापही नव्हता.
आफताबने नार्को टेस्टमध्ये हत्येची कबुली दिली. नार्को टेस्टदरम्यान आफताबला श्रद्धाचा फोन कुठे आहे असे विचारले असता, आफताबने श्रद्धाचा फोन कुठेतरी फेकल्याचे उत्तर दिले. आफताबने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचे मान्य केले आहे.
नार्को टेस्टमध्ये आफताबने करवतीचा वापर करून श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केल्याची कबुली दिली आहे. आफताबला या खून प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का, असे विचारले असता, त्याने एकट्याने ही हत्या घडवून आणल्याचे सांगितले. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांची जंगलात विल्हेवाट लावल्याची कबुली नार्को टेस्टमध्ये दिली आहे.
जरी आफताब पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल करत असला तरी हे पुरेसे नाही. पोलिसांकडे अद्याप ठोस पुरावे नाहीत. नार्को चाचणीचे प्रकरण थेट न्यायालयात मान्य होत नाही. आफताबने जे सांगितले ते फक्त एक दुवा आहे, ज्यातून पोलिसांना आता पुरावे गोळा करायचे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Delhi, Murder