मुंबई, 11 डिसेंबर : श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या केली होती. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या हत्याकांडात आता दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. दरम्यान या प्रकरणात श्रद्धा वालकरच्या वडिलांनी तुळींज आणि माणिकपूर पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. जर दोन्ही पोलिसांनी तपास योग्य दिशेने केला असता तर आज माझी मुलगी जिवंत असती असं श्रद्धाच्या वडिलांनी म्हटलं होतं. त्यानंतर या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या चौकशीचे आदेश दिले होते. आता या प्रकरणात पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे. मात्र दोन्ही पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. नेमका काय आहे श्रद्धाच्या वडिलांचा आरोप? श्रद्धा वालकरची हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर तिचे वडील विकास वालकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. श्रध्दाने 2019 मध्ये तुळींज पोलीस ठाण्यात जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. तसेच माणिकपूर पोलिसांनी ती बेपत्ता असल्याचा तपास योग्य पद्धतीने केला नाही असा आरोप श्रद्धा वालकरच्या वडिलांनी केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या चौकशीचे आदेश दिले होते. आता या प्रकरणात पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे. पोलिसांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. हेही वाचा : मित्रांसोबतची ‘ती’ सेल्फी जीवावर बेतली; जालन्यातील तरुणासोबत धक्कादायक घटना पोलिसांनी काय म्हटलं? पोलिसांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तुळींज पोलीस ठाण्यात श्रध्दाने आफताब विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाची 26 दिवस चौकशी देखील करण्यात आली. मात्र त्यानंतर श्रध्दाने माघार घेतल्यानं अर्ज निकाली काढला असं पोलिसांनी सांगितलं आहे. आमचा तपास आणि श्रध्दाच्या अर्जावर केलेली कारवाई योग्य होती. कुठेही हलगर्जीपणा झाला नाही. त्यामुळे वालकर यांनी केलेले आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.