जालना, 11 डिसेंबर : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सेल्फी घेणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. सेल्फी घेण्याच्या नादात तो खदानीत पडला. खदानीत बुडून या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जालना तालुक्यातील खरपुडी परिसरात ही घटना घडली आहे. अथर्व गिरी असं खदानीत पडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो खरपुडी येथील कृषी विद्यालयात शिक्षण घेत होता. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मित्रांसोबत फोटोशूट घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास तीन मित्र आणि दोन मैत्रिणींसोबत अथर्व हा फोटोशूट करण्यासाठी खदानीच्या काठावर गेला होता. यावेळी सेल्फी काढताना त्याचा मोबाईल हातातून निसटला आणि खदानीत पडला. त्यानंतर तो खदानीमधून आपला मोबाईल बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र याचवेळी तोल जाऊन तो देखील खदानीत पडला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा : वर्धा : महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस म्हणाले… पोलीस घटनास्थळी दाखल दरम्यान घटनेची माहिती मिळताच जालना पोलीस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्थव गिरी याचा मृतदेह खदानीतून बाहेर काढला आहे. अर्थव गिरी याच्या असं अचानक जाण्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







