जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मोठा पुरावा! आफताब आणि श्रद्धामध्ये नेमकं काय झालं? त्या भांडणाची ऑडिओ क्लिप हाती

मोठा पुरावा! आफताब आणि श्रद्धामध्ये नेमकं काय झालं? त्या भांडणाची ऑडिओ क्लिप हाती

मोठा पुरावा! आफताब आणि श्रद्धामध्ये नेमकं काय झालं? त्या भांडणाची ऑडिओ क्लिप हाती

Shraddha Murder Case: पोलिसांना आफताबचा एक ऑडिओ मिळाला आहे. यामध्ये आफताब श्रद्धासोबत भांडत आहे. या ऑडिओमध्ये आफताब आणि श्रद्धा यांच्यात वाद सुरू असल्याचं ऐकू येत आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली 26 डिसेंबर : श्रद्धा हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांना मोठे ऑडिओ पुरावे मिळाले आहेत. पोलिसांना आफताबचा एक ऑडिओ मिळाला आहे. यामध्ये आफताब श्रद्धासोबत भांडत आहे. या ऑडिओमध्ये आफताब आणि श्रद्धा यांच्यात वाद सुरू असल्याचं ऐकू येत आहे. इतकंच नाही तर आफताब श्रद्धाला टॉर्चर करत होता हे ऑडिओवरून सिद्ध होत आहे. दिल्ली पोलीस या ऑडिओला मोठा पुरावा मानत आहेत. या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, की या ऑडिओमुळे हत्येचा नेमका हेतू शोधण्यासाठी मोठा फायदेशीर ठरू शकतो. या ऑडिओशी आफताबचा आवाज जुळण्यासाठी पोलीस त्याच्या आवाजाचा नमुना घेणार आहेत. सीबीआयची सीएफएसएल टीम आफताबच्या आवाजाचा नमुना घेईल. दिलदारने रिबिकाची कातडी सोलून केले 50 तुकडे; डॉक्टर म्हणाले, असे पोस्टमॉर्टम कधीच केले नाही आफताब सध्या तिहार तुरुंगात बंद आहे. सीबीआय त्याला सोमवारी सकाळी 8 वाजता तिहार तुरुंगातून घेऊन जाईल. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबची नार्को टेस्ट झाली आहे. यापूर्वी त्याला पॉलीग्राफ चाचणीलाही सामोरे जावं लागलं होतं. पोलिसांच्या चौकशीत आफताबनेच श्रद्धाची हत्या केल्याचं सांगितलं होतं. आफताब हा श्रद्धाचा प्रियकर होता. दोघेही मुंबईचे रहिवासी असून काही दिवसांपूर्वी ते दिल्लीला शिफ्ट झाले होते. दिल्लीत दोघेही मेहरौली येथे फ्लॅट घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आफताबने सांगितलं होतं की, 18 मे रोजी त्याचं श्रद्धासोबत भांडण झालं होतं. यानंतर त्याने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले. आफताबने हे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. तो दररोज रात्री श्रद्धाच्या मृतदेहाचा तुकडा मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात असे. आफताबला १२ नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. श्रद्धा वालकर हत्याकांड: कुटुंबीयांना भेटणार का? आफताबचं उत्तर ऐकून अधिकारीही झाले चकित श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता. कुणाला तिच्या हत्येचा संशय येऊ नये म्हणून तो श्रद्धाचे सोशल मीडिया अकाउंट वापरत राहिला. आफताबने श्रद्धाच्या खात्यातून 54 हजार रुपयेही ट्रान्सफर केले होते. श्रद्धाचे मोबाइल लोकेशन आणि बँक खात्याच्या तपशीलाच्या मदतीने पोलीस आफताबपर्यंत पोहोचले. आफताबला पोलिसांनी १२ नोव्हेंबरला अटक केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात