नवी दिल्ली 21 डिसेंबर : तिहार तुरुंगात बंद असलेल्या श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याने कुटुंबीयांना भेटण्यास नकार दिला आहे. या वर्षी मे महिन्यात आफताबने प्रेयसी श्रद्धा वालकरची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले होते. कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपीने त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यास नकार दिला आहे. जेल अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पूनावालाच्या वागण्याने ते आश्चर्यचकित झाले आहेत. कारण तो फोनवरही कुटुंबाशी बोलत नाही. त्याने गेल्या आठवड्यात शहरातील न्यायालयात त्याच्या वकिलाने दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की “तो फक्त त्याच्या वकिलाशी बोलतो. एकतर त्याने पुढचं सगळं नशीबावर सोडलं आहे किंवा त्याने त्याच्या पुढच्या चाली आधीच ठरवल्या असतील.” Shraddha Case: अखेर श्रद्धाच्या मृतदेहाच्या हाडांमधून सत्य उघड, आता आफताबचा फास आवळणार जेल अधिका-यांनी सांगितलं की पूनावाला सहसा एकटाच राहतो, मात्र त्याने आपल्या सेलमेट्सना सांगितलं आहे की या आठवड्याच्या शेवटी कोणीतरी त्याला भेटेल अशी अपेक्षा आहे. मात्र, त्यानी अद्याप कोणाचंही नाव कारागृह अधीक्षकांना दिलेलं नाही. पूनावालाला आणखी दोन कैद्यांसह एका कोठडीत ठेवण्यात आले आहे. दोन्ही कैदी त्याच्यावर लक्ष ठेवून असतात. त्याचबरोबर सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोवीस तास नजर ठेवली जात आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तो क्वचितच त्याच्या सहकारी कैद्यांशी बोलतो. तो त्याच्या सेलमध्ये रीडिंगमध्ये वेळ घालवतो. अधीक्षकांनी त्याला भेट घेण्याविषयी आणि फोन वापरण्याच्या नियमांबद्दल माहिती दिली. पण मला कोणाशीही बोलायचं आणि भेटायचं नाही, असं त्याने सांगितलं आहे. Shraddha Walker Murder Case : श्रद्धाच्या वडिलांचे आरोप, फडणवीसांचे चौकशीचे आदेश, आता मोठी अपडेट समोर आफताब अमीन पूनावाला यानी शनिवारी दिल्ली न्यायालयाला माहिती दिली की त्याने ‘वकीलपत्रावर’ स्वाक्षरी केली. परंतु त्यांच्या वतीने जामीन अर्ज दाखल केला जाईल हे त्याला माहिती नव्हते. आफताब हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश वृंदा कुमारी यांच्या न्यायालयात हजर झाला होता. न्यायाधीशांनी त्याला, जामीन अर्ज मागे घ्यायचा आहे का? असे विचारले असता, पूनावाला म्हणाला, ‘वकिलाने माझ्याशी बोलावे अशी माझी इच्छा आहे’ मग त्याने जामीन अर्ज मागे घेतला." न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 डिसेंबर निश्चित केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







