मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /दिलदारने रिबिकाची कातडी सोलून केले 50 तुकडे; डॉक्टर म्हणाले, असे पोस्टमॉर्टम कधीच केले नाही

दिलदारने रिबिकाची कातडी सोलून केले 50 तुकडे; डॉक्टर म्हणाले, असे पोस्टमॉर्टम कधीच केले नाही

झारखंडमधील साहिबगंजमध्ये दिल्लीतील श्रद्धा वालकर खुनाशी साम्य असलेली घटना घडली आहे.

झारखंडमधील साहिबगंजमध्ये दिल्लीतील श्रद्धा वालकर खुनाशी साम्य असलेली घटना घडली आहे.

झारखंडमधील साहिबगंजमध्ये दिल्लीतील श्रद्धा वालकर खुनाशी साम्य असलेली घटना घडली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Jharkhand, India

    साहिबगंज, 22 डिसेंबर : झारखंडमधील साहिबगंजमध्ये दिल्लीतील श्रद्धा वालकर खुनाशी साम्य असलेली घटना घडली आहे. या घटनेत पतीनं पत्नीची हत्या करून तिच्या शरीराचे 50 पेक्षा जास्त तुकडे केले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, मृत रिबिका पहाडीन (वय 22) हिने तिच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन महिनाभरापूर्वी दिलदार अन्सारी (वय 25) नावाच्या तरुणाशी प्रेमविवाह केला होता. शनिवारी (17 डिसेंबर) रिबिकाची हत्या करण्यात आली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी दिलदार आणि त्याच्या कुटुंबीयांनी रिबिकाच्या मृतदेहाचे 50 तुकडे केले. काही तुकडे घरात लपवून ठेवले होते, तर काही तुकडे परिसरातील निर्जन ठिकाणी फेकले होते. लोकांनी कुत्र्यांना मानवी मांस खाताना पाहिलं तेव्हा, या प्रकरण उघडकीस आलं. ‘दैनिक भास्कर’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    दुमका येथील 'फुलो-झानो मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये रिबिकाच्या मृतदेहाच्या तुकड्यांचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. तीन डॉक्टरांच्या पथकानं हे पोस्टमॉर्टेम केलं. आज (22 डिसेंबर) त्याचा अहवाल मिळण्याची शक्यता आहे. या टीममधील एका डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रिबिकाची हत्या अतिशय क्रूरपणे झाली आहे. याची कल्पनाही करता येणार नाही. मारेकऱ्यांनी रिबिकाच्या शरीराची कातडीही सोलून काढली होती. तिच्या मृतदेहाचे इलेक्ट्रिक कटरने छोटे तुकडे केले होते. त्यासाठी सात ते आठ तासांचा कालावधी लागला असेल.

    मृतदेहाचे 28 तुकडे पोस्टमॉर्टेमसाठी आणल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यामध्ये डोकं, फुफ्फुस, सात बोटं, डाव्या बाजूच्या बरगडीच्या फासळ्या, पोटाचा काही भाग असे अनेक अवयव गायब आहेत. शिवाय दोन्ही किडन्यादेखील अर्ध्याच आहेत. पुढील तपासणीसाठी नमूना म्हणून राखून ठेवता येईल, असा पोटाचा भागदेखील फार कमी आहे. रिबिकाचं गर्भाशय सापडलं आहे, जे तपासणीसाठी जतन करण्यात आलं आहे. हाडं, नखे आणि गर्भाशयाचा भाग व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला जाईल. मृतदेहाचं डी-कंपोझिंग सुरू झालं होतं म्हणजेच हा खून दोन-तीन दिवसांपूर्वी झाला असावा. अशा प्रकारचं पोस्टमॉर्टेम पहिल्यांदाच केलं असल्याचं डॉक्टर म्हणाले.

    सासूने दिली होती हत्येची सुपारी - 

    रिबिका खून प्रकरणात पोलिसांनी बुधवारी (21 डिसेंबर) मोठा खुलासा केला. रिबिकाची सासू मरियम निशा हिने तिचा भाऊ मोइनुल अन्सारी याला रिबिकाची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 20 हजार रुपयांची सुपारी दिली होती. पोलिसांनी बुधवारी न्यायालयातून, मरियम निशा आणि दिलदारचा मामा मोईनुल याचा मित्र मैनुल हक मोमीन यांची कस्टडी मिळवली आहे. न्यायालयानं दोघांना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याची परवानगी दिली आहे. पोलीस त्यांच्याकडून रिबिकाच्या हत्येची कारणं शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. बोरीओ पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक सुषमा कुमारी यांनी हत्येप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.

    हेही वाचा - बहिणीचाच संसार केला उद्ध्वस्त, लग्नाच्या 6 महिन्यात तरुणीचं मेहुण्यासोबत धक्कादायक कृत्य

    असे सापडले आरोपी -

    रिबिका आणि दिलदार यांचे खूप दिवसांपासून प्रेम संबंध होते. पण, दोघांचंही कुटुंब त्यांच्या लग्नासाठी तयार नव्हतं. रिबिकाचे वडील सुरजा पहाडीन आणि आई चांदी पहाडीन हे दोघांच्या नात्याला विरोध करत होते. महिनाभरापूर्वी दोघेही घरातून पळून पोलिसांकडे गेले होते. पोलिसांनी दोघांचं लग्न लावून दिलं होतं. त्यामुळे मिळालेल्या मृतदेहाचे तुकडे रिबिकाचे असल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांनी दिलदारच्या घरी पोहोचून रिबिकाबाबत विचारणा केली. त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.

    नेल पॉलिशमुळे पटली ओळख -

    पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिबिकाचं डोकं शोधून काढणं फार कठीण आहे. आरोपींनी तिच्या डोक्याचे अनेक तुकडे केले आहेत. पायाचा अंगठा मिळाल्यानंतर त्यावरील नेलपॉलिशवरून मृतदेहाची ओळख पटली आहे. आरोपीचा मामा मोईनुल अन्सारीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. त्याचा मोबाईल बंद असल्यानं त्याला पकडण्यात अडचण येत आहे. दिलदारच्या मामाच्या घरी रिबिकाची हत्या झाली होती. तिथे घरात जागा कमी असल्याने तो मृतदेह घेऊन मित्र मैनुल हकच्या घरी घेऊन गेला होता. तिथेच जमिनीवर प्लॅस्टिक टाकून मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते.

    First published:

    Tags: Crime, Jharkhand, Murder Mystery