मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नार्को टेस्टमध्ये गुन्हेगार खरंच सत्य सांगतात? आफताबचा पर्दाफाश होणार; 2 तासात विचारले गेले हे प्रश्न

नार्को टेस्टमध्ये गुन्हेगार खरंच सत्य सांगतात? आफताबचा पर्दाफाश होणार; 2 तासात विचारले गेले हे प्रश्न

shraddha walker murder case

shraddha walker murder case

श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची गुरुवारी दिल्लीतील भीमराव आंबेडकर रुग्णालयात नार्को टेस्ट करण्यात आली. यावेळी या प्रकरणाशी संबंधित अधिकारी आणि तज्ज्ञांचे पथक तिथे उपस्थित होते

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 01 डिसेंबर : दहशतवादी अजमल कसाबपासून ते अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचं प्रकरण, ही सर्व प्रकरणे आहेत, ज्याचं सत्य जाणून घेण्यासाठी पोलीस आणि सीबीआयला लोकांची नार्को टेस्ट करावी लागली होती. पण प्रश्न असा आहे की, नार्को टेस्टच्या वेळी या लोकांनी खरंच खरं सांगितलं का? हा प्रश्न आता उपस्थित होतो, कारण श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची नार्को टेस्ट नुकतीच केवळ पुरावे मिळविण्यासाठी करण्यात आली आहे.

श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची गुरुवारी दिल्लीतील भीमराव आंबेडकर रुग्णालयात नार्को टेस्ट करण्यात आली. यावेळी या प्रकरणाशी संबंधित अधिकारी आणि तज्ज्ञांचे पथक तिथे उपस्थित होते. आफताबची नार्को चाचणी सुमारे दोन तास चालली. परीक्षेदरम्यान त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने बहुतांश प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

ब्रेन मॅपिंग करणार आफताबचा पर्दाफाश! तज्ज्ञ म्हणाले, तो मानसिकदृष्ट्या आजारी नाही, पण..

आफताबने अनेक प्रश्नांची उत्तरे इंग्रजीत दिली. काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आफताबने थोडा वेळ घेतला. चाचणीदरम्यान आफताबने अनेक प्रश्नांवर मौन बाळगले पण टीमने प्रश्न पुन्हा केला आणि त्याला उत्तर देण्यास सांगितले, त्यानंतर आफताबने उत्तर दिले.

दिल्लीतील भीमराव आंबेडकर रुग्णालयात 1 डिसेंबरला सकाळी आफताबची नार्को चाचणी करण्यात आली. जी सुमारे दोन तास चालली. या चाचणीदरम्यान आफताबला असे प्रश्न विचारले गेले उत्तरांनी श्रद्धा खून प्रकरणाचे गूढ उकलले जाऊ शकते. ही नार्को टेस्ट दिल्ली पोलिसांसाठी अतिशय महत्त्वाची आहे.

श्रद्धा हत्याकांडातील सर्वात कमकुवत बाब म्हणजे या प्रकरणात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. म्हणजे आता जे काही आहे किंवा पोलिसांना जे काही करायचे आहे ते फक्त काही मानवी हाडे, रक्ताचे काही थेंब आणि आफताबची बदलती विधाने समोर ठेवूनच करायचे आहे. अशा परिस्थितीत, नार्को चाचणीदरम्यान आफताबने असे काही संकेत किंवा पुरावे उघड करणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्याची सुटका अशक्य होईल.

या नार्को टेस्टदरम्यान पोलिसांनी आफताबला विचारलेले काही प्रश्न -

श्रद्धाची हत्या कोणत्या तारखेला केली

श्रद्धाला का मारलं?

श्रद्धाला कसं मारलं

मृतदेहाचे तुकडे कसे केले

तुकडे करण्यासाठी हत्यार कुठून खरेदी केलं

तुकडे घरात किती काळ ठेवले

तुकडे कुठे आणि कसे ठेवले

मृतदेहाचे तुकडे कुठे कुठे फेकले

हत्यारं कुठे फेकली

हत्येनंतर सहा महिने काय काय केलं

हत्या रागात आणि चुकून केली असेल तर तेव्हाच पोलिसांसमोर सरेंडर का केलं नाही.

First published:

Tags: Crime, Murder