मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ब्रेन मॅपिंग करणार आफताबचा पर्दाफाश! तज्ज्ञ म्हणाले, तो मानसिकदृष्ट्या आजारी नाही, पण..

ब्रेन मॅपिंग करणार आफताबचा पर्दाफाश! तज्ज्ञ म्हणाले, तो मानसिकदृष्ट्या आजारी नाही, पण..

ब्रेन मॅपिंग करणार आफताबचा पर्दाफाश!

ब्रेन मॅपिंग करणार आफताबचा पर्दाफाश!

Shraddha Walkar Murder: पोलिसांनी सांगितले की, आफताब पूनावाला आणि श्रध्दा वालकर यांच्यात आर्थिक कारणावरून भांडण व्हायचे. दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर पूनावालाने 18 मे रोजी सायंकाळी 27 वर्षीय श्रद्धा वालकरची हत्या केल्याचा संशय आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 23 नोव्हेंबर : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. आरोपी आफताबची ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात येणार आहे. या संदर्भात इंस्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेविअर अँड अलाईड सायन्सेसचे माजी संचालक निमेश जी. देसाई यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पूनावालासारखे लोक मानसिकदृष्ट्या आजारी नसतात. पण, ते किशोरावस्थेपासून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जातात, असं त्याचं मत आहे. आफताब याच्यावर त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर (27) हिची हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केल्याचा आरोप आहे.

डॉ. देसाई म्हणाले, जे मानसिक आजारी असतात ते वेगळे असतात. पण आफताबसारखी माणसं कुणाशीही भांडायला, मारामारी करायला आणि इतरांना इजा करायला कधीच मागेपुढे पाहत नाहीत. आरोपीची क्लासिकल सोशल प्रोफाइल आहे, यात शंका नाही. असे लोक आपल्या मनाप्रमाणे वागतात आणि इतरांना अपमानित करतात. ते पुढे म्हणाले, 'आमच्याकडे काही पद्धती आहेत, ज्या आपल्याला सत्य उघड करण्यास मदत करतात. ब्रेन मॅपिंगच्या प्रक्रियेतून सत्य बाहेर येऊ शकते. ब्रेन मॅपिंगमध्ये कोणतेही रासायनिक पदार्थ वापरले जात नाहीत.

या मशीनमुळे श्रद्धा हत्याकांडातील आफताबचा पर्दाफाश होणार

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यामार्फत खून प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ब्रेन मॅपिंगद्वारे आफताबचे खोटे तज्ज्ञ सहजपणे पकजू शकतात. गुन्हेगार किंवा संशयिताचं मन वाचण्याचा यात प्रयत्न केला जातो. गुन्हेगार किंवा संशयिताच्या डोक्यावर एक खास यंत्र बसवले जाते. त्यानंतर चाचणीदरम्यान त्याच्या मेंदूचा अभ्यास केला जातो. त्याच्या मेंदूच्या लहरी वाचल्या जातात. चाचणी दरम्यान, जर गुन्हेगार किंवा संशयिताने गुन्हा केला असेल तर त्याच्या मेंदूच्या लहरी मशीनमध्ये बसवलेल्या सेन्सर्सद्वारे पकडल्या जातील.

वाचा - आफताब हत्या करून तुकडे करणार हे श्रद्धाला माहिती होतं? 2 वर्षापूर्वीचं पत्र समोर

आफताब पूनावाला याला 12 नोव्हेंबर रोजी दक्षिण दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकरच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये मारल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि तिच्या शरीराचे सुमारे 35 तुकडे केले, जे त्याने घरी 300 लिटरच्या फ्रीजमध्ये सुमारे तीन आठवडे ठेवले होते. मध्यरात्री शहरातील विविध भागात फेकण्यासाठी तो अनेक दिवस फिरत होता.

पोलिसांनी सांगितले की, दोघांमध्ये आर्थिक कारणावरून भांडण होत असे. दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर पूनावालाने 18 मे रोजी सायंकाळी 27 वर्षीय श्रद्धा वालकरची हत्या केल्याचा संशय आहे. श्रद्धा ही पालघर जिल्ह्यातील वसईची रहिवासी होती. दोघेही मुंबईत 'बंबल' या डेटिंग अॅपच्या माध्यमातून भेटले होते. त्यानंतर ते मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये एकत्र काम करू लागले आणि तिथूनच दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले. नंतर ते दिल्लीला आले होते.

First published:

Tags: Crime, Vasai