मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Shraddha Murder Case: श्रद्धाला मारल्याचा कोणताही पश्चाताप नाही, पॉलीग्राफ टेस्टनंतर आफताबची कबुली

Shraddha Murder Case: श्रद्धाला मारल्याचा कोणताही पश्चाताप नाही, पॉलीग्राफ टेस्टनंतर आफताबची कबुली

श्रद्धाला मारल्याचा कोणताही पश्चाताप नाही

श्रद्धाला मारल्याचा कोणताही पश्चाताप नाही

नुकतीच आरोपी आफताबची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर श्रद्धा हत्याकांडाबाबत मोठी माहिती समोर येत आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 नोव्हेंबर: वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीची तिचा प्रियकर आफताब पूनावालाने दिल्लीत हत्या केली. हत्येनंतर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे करून दिल्लीतील मेहरौली जंगलात फेकून दिले होते. हत्येच्या जवळपास सहा महिन्यांनी या प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर दिल्ली पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. नुकतीच आरोपी आफताबची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर श्रद्धा हत्याकांडाबाबत मोठी माहिती समोर येत आहे. या संदर्भात ‘टीव्ही 9 हिंदी’ने वृत्त दिलंय.

मंगळवारी करण्यात आलेल्या पॉलीग्राफ टेस्टमध्ये आरोपी आफताबने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. पॉलीग्राफ टेस्ट करणाऱ्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाला मारल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हटलंय. आता 1 डिसेंबरला आफताबची नार्को टेस्ट होणार आहे.

विवाहित प्रेयसीसोबत राहू देत नाही, प्रेमवीर सरपंचाने घेतलं विष, जिल्हाधिकाऱ्यांनी लावला डोक्याला हात

मंगळवारी आफताबची पाचवी म्हणजेच शेवटची पॉलीग्राफ चाचणी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) कार्यालयात झाली. एफएसएलच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, आफताबची पॉलीग्राफ टेस्ट पूर्ण झाली आहे आणि त्याचा रिपोर्ट लवकरच न्यायालयात सादर केला जाईल. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांना 1 डिसेंबरला आफताबची नार्को टेस्ट करण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे.

मंगळवारी आफताबला कडेकोट पोलीस बंदोबस्तात पाचव्यांदा एफएसएल कार्यालयात आणण्यात आलं. कारण सोमवारी काही तलवारधारी व्यक्तींनी त्याला घेऊन जाणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या व्हॅनवर हल्ला केला होता. हे लोक हिंदू सेनेचे सदस्य होते. या हल्ल्यानंतर एफएसएल कार्यालयाबाहेर सीमा सुरक्षा दलाला तैनात करण्यात आलं होतं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना श्रद्धाच्या जबड्याचं हाड आफताबने सांगितलेल्या ठिकाणावरून सापडलं आहे. गुरुग्राममधून श्रद्धाच्या मृतदेहाचे आणखी अनेक तुकडे सापडले आहेत. आफताबच्या फ्लॅटमध्ये बाथरूम, किचन आणि बेडरूममध्ये रक्ताचे डाग आढळून आले आहेत. त्यांचा तपास अहवाल येण्यास थोडा वेळ लागेल. दरम्यान, आतापर्यंत श्रद्धाच्या शरीराच्या 13 अवयवांची हाडं सापडली आहेत.

सुनेवर ठेवली वाईट नजर, मुलाने केला वार.. नवऱ्याचे 22 तुकडे केल्याचे आरोपी महिलेची कबुली

दुसरीकडे, पॉलीग्राफ चाचणीत आफताबने आणखी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. ‘दैनिक जागरण’च्या वृत्तानुसार, चौकशीदरम्यान आफताबने सांगितलं होतं की, श्रद्धाची हत्या केल्याचा त्याला कोणताही पश्चाताप नाही. या प्रकरणात त्याला फाशीची शिक्षा झाली तरी दु:ख होणार नाही, कारण तो स्वर्गात गेल्यावर त्याला हूर म्हणजे अप्सरा मिळेल. आफताबचे केवळ श्रद्धाच नव्हे तर त्याचे तिच्यासारख्या जवळपास 20 हिंदू मुलींशी संबंध होते. सध्या दिल्ली पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत असून, श्रद्धाच्या शरीराचे इतर तुकडे शोधण्याचा प्रयत्नही केला जात आहे.

First published:

Tags: Breaking News, Crime, India