सर, तुम्ही सुद्धा! मुख्याध्यापकाचा काटा काढण्यासाठी तरुणाला घेऊन दिला गावठी कट्टा, पण...

सर, तुम्ही सुद्धा! मुख्याध्यापकाचा काटा काढण्यासाठी तरुणाला घेऊन दिला गावठी कट्टा, पण...

मालेगांव तालुक्यातील अमाणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली आहे.

  • Share this:

किशोर गोमाशे, प्रतिनिधी

वाशिम, 24 जुलै : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेवर मुख्याध्यापकावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, एका शिक्षकानेच हल्लेखोर तरुणाला पिस्तुल खरेदीसाठी पैसे दिले होते. या प्रकरणी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मालेगांव तालुक्यातील अमाणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली आहे. आज सकाळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी 5 - 6 शिक्षकांची बैठक बोलावली होती. शाळेच्या कार्यालयात ही बैठक सुरू असताना अचानक एक तरुण तिथे पोहोचला. त्यानंतर मुख्याध्यापकांच्या दिशेनं त्याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. सुदैवाने देव बलवत्तर असल्यामुळे मुख्याध्यापकांना गोळी लागली नाही. या घटनेत इतर कुणीही जखमी झालं नाही.

कैद्याच्या घरी बोकड पार्टी झोडली, दोन पोलिसांची ड्युटीच गेली!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमाणी येथील 22 वर्षीय सुशांत खंडारे हा युवक स्थानिक जिल्हा परिषदेचा विद्यार्थी आहे. याला शाळेत शिकत असल्याचा निर्गम उतारा पाहिजे असल्याने त्याने तसा अर्जही दिला होता, मात्र, उशीर होत असल्याचं कारण पुढे करत आज मुख्याध्यापक विजय बोरकर आणि शाळेतील इतर 5 - 6 शिक्षक कार्यालयात असतांना सुशांत खंडारे हा शाळेच्या कार्यालयात थेट दाखल झाला त्यानंतर त्याने हातामधील कट्टा शिक्षकांकडे फिरवित धमकावले आणि त्यातील गोळी झाडली. पण, सुदैवाने ती गोळी कपाटावर लागली. या गोळीबारामुळे शिक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला.त्यानंतर तो विद्यार्थी तो कट्टा तिथेच टाकून पळून गेला.

त्यानतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले, कर्मचारी गजानन काळे, सुधीर सोळंके आणि इतरांनी या युवकाला पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणले. ज्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही असा एखादा विद्यार्थी केवळ निर्गम उतारा मिळण्यास उशीर होत असल्याच्या कारणासाठी गोळीबार करणार नाही, हे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,सहाय्यक पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.पवनकुमार बन्सोड यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सखोल चौकशी केल्यावर धक्कादायक वास्तव समजले.

उदयनराजेंना रोखण्याची आवश्यकता नव्हती, विधानसभा अध्यक्षांचा खुलासा

त्याच शाळेत कार्यरत असलेले गजानन इंगळे यांच्याकडे शाळेच्या मुख्याध्यापकाचा प्रभार होता. मात्र, त्यांच्याकडील हा प्रभार काढून विजय बोरकर या शिक्षकाकडे देण्यात आल्यानं गजानन इंगळे यांच्या मनात द्वेष भावना तयार झाली होती.

त्यामुळे या शिक्षकाने सुशांत खंडारे या युवकाच्या डोक्यात भरवले आणि कट्टा खरेदीसाठी 40 हजार रुपये दिले. त्यांनतर याने एक कट्टा खरेदी केला. तसंच एक दिखाऊ पिस्टल ही ऑनलाइन खरेदी केली होती. आज या कट्टयामधून सुशांत खंडारे याने शाळेत जाऊन शिक्षकांना धमकावत गोळी झाडली.

या घटनेनंतर आरोपी युवक आणि शिक्षक गजानन इंगळे या दोघांना ताब्यात घेतले असून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ पवनकुमार बन्सोड यांच्या मार्गदर्शनात मालेगांव चे ठाणेदार आधारसिंग सोनोने सखोल तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Published by: sachin Salve
First published: July 24, 2020, 2:23 PM IST

ताज्या बातम्या