मुंबई 20 ऑक्टोबर : असे अनेक लोक आहेत, ज्यांना नॉनवेज खायला खूप आवडतं. आपल्या आजूबाजूला आपल्याला वेज-नॉनवेज दोन्ही प्रकारचे जेवण खाणारे लोक दिसतील. जेवण खाण्याची प्रत्येक व्यक्तीची आपली इच्छा आणि चव असते आणि त्यासाठी कोणीही जबरदस्ती करु शकत नाही. पण जेवणासंबंधीत एक असं विचित्र प्रकरण समोर आलं आहे, जे जाणून तुम्हाला विश्वास ठेवणं देखील कठीण होईल. येथे मटणामुळे एका तरुणाचा जीव गेला आहे. खरंतर या तरुणाची काहीही चुक नसताना दुसऱ्याच लोकांच्या चुकीमुळे त्याच्यावर ही वेळ आली. आता तुमच्या मनात प्रश्व उभा राहिला असेल की, हे प्रकरण नक्की आहे तरी काय? चला जाणून घेऊ… खरंतर पती-पत्नीच्या भांडणातून शेजाऱ्याची हत्या झाली. प्रत्यक्षात मंगळवारी घरात मटण बनवण्यावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. तेव्हा पती पत्नीला मारहाण करत होता. तेव्हा बायको वाचवा-वाचवा असं ओरडत होती. हे ही वाचा : नोकरी करते म्हणून पत्नीला अमानुष मारहाण करत व्हिडिओ बनवला; पोलिसांनी अशी घडवली अद्दल हे ऐकून शेजारील तरुण हे भांडण सोडवण्यासाठी पुढे आला, पण यासगळ्यात त्याचाच जीव गेला. या तरुणाचं नाव बल्लू आहे. खरंतर जेव्हा नवरा बायको भांडण करत होते. तेव्हा आधी बल्लूने हे भांडण थांबले, पण थोड्यावेळाने तो रागावलेला नवरा, हाताता बांबू घेऊन बल्लूच्या घरी गेला आणि त्याच्या डोक्यात मारला, ज्यानंतर बल्लू गंभीर जखमी झाला आणि काही वेळाने त्याचा जीव देखील गेला. बल्लूला मारल्यानंतर पप्पू तेथून फरार झाला, ज्यानंतर त्याच्या बायकोनं पोलिसांना या घटनेबद्दल कळवलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बल्लूला रुग्णालयाता पोस्टमोर्टमसाठी पाठवलं. हे ही वाचा : डॉक्टर पत्नीचं भयंकर कृत्य; बिझनेसमन पतीला मांत्रिकाला भेटवलं, कोट्यावधींची फसवणूक पप्पूच्या बायकोची तक्रार घेतल्यानंतर पोलिसांनी पप्पूला शोधून काढलं आणि ताब्यात घेतलं, ज्यानंतर पप्पूनं आपल्या वक्तव्यात सांगितलं की, त्याला मटण खायचं होतं, पण मंगळवार असल्यामुळे त्याची बायको त्याला ते खाऊ देत नव्हती, म्हणून त्याने तिला मारायला सुरुवात केली. तेव्हा बल्लू त्यांच्या भांडणात आला, जे पप्पूला आवडले नाही, म्हणून त्याने रागाच्या भरात त्याच्या डोक्यात बांबू घातला. आता पोलीसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.