तिरुअनंतपुरम 20 ऑक्टोबर : वारंवार सांगूनदेखील नोकरी सोडत नसल्यानं पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. केरळमधील मलयंकिझू येथे ही घटना घडली. संबंधित व्यक्ती पीडित महिलेला मारहाण करीत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला खूनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली. डॉक्टर पत्नीचं भयंकर कृत्य; बिझनेसमन पतीला मांत्रिकाला भेटवलं, कोट्यावधींची फसवणूक ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, माशेल येथील रहिवासी असणारा 27 वर्षीय दिलीप याची 24 वर्षांची पत्नी सुपरमार्केटमध्ये नोकरी करत होती. स्वतःची पत्नी नोकरी करत असल्याचं दिलीपला आवडत नव्हतं. तो वारंवार तिला नोकरी सोडण्यास सांगत होता. मात्र, तिनं नोकरी सोडण्यास नकार दिला, व ती त्याच्या इच्छेविरुद्ध सुपरमार्केटमध्ये काम करण्यासाठी जात होती. याचा राग आल्यानं दिलीपनं दारूच्या नशेत त्याच्या पत्नीला अमानुष मारहाण केली, यात तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली, व चेहरा रक्तबंबाळ झाला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दिलीपला अटक केली. आरोपीनंच शूट केला होता व्हिडिओ व्हायरल झालेला व्हिडिओ हा आरोपी दिलीप यानेच शूट केल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये पीडित महिला कर्ज फेडण्यासाठी नोकरीवर जाते, असं म्हणताना दिसतेय. ‘जर मी नोकरी केली नाही, तर माझी मुलं उपाशी राहतील,’ असंही पीडिता दिलीपला सांगत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. परंतु, शेवटी दबावाखाली ती नोकरी सोडण्यास तयार होते. हा व्हिडिओ पीडित महिलेच्या मित्रांच्या पाहण्यात आला, त्यानंतर त्यांनी तिला दिलीपच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. दोघांनी स्वतःच्या इच्छेनं एकमेकासोबत केलं होतं लग्न मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी व पीडित महिला या दोघांनी स्वतःच्या इच्छेनं एकमेकांशी लग्न केलं होतं. ते कुटुंबापासून वेगळे राहत होते. आरोपी दररोज दारू पिऊन घरी येत होता, व तो पत्नीला मारहाण करीत होता. त्यामुळे घरमालकानं अनेकदा त्यांना घर सोडून जाण्यास सांगितलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांत या जोडप्यानं सहा वेळा घर बदललं होतं. भंडारा : एक्स गर्लफ्रेंडच्या सततच्या त्रासाला कंटाळला तरुण; जंगलातच घेतला गळफास दरम्यान, आजच्या काळात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी संसार चालवण्यासाठी पती-पत्नी दोघांनी नोकरी करण्याचं प्रमाण वाढत आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला आता जवळपास सर्वच क्षेत्रांत नोकरी करताना दिसत आहेत. नोकदार महिलांना अनेकजण पाठिंबा देत आहेत. मात्र, स्वतःच्या पत्नीनं नोकरी करू नये, अशा स्वरुपाच्या अपप्रवृत्ती असणारे दिलीप सारखे लोक आजही समाजात असल्याचं या घटनेनंतर समोर आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.