जयपूर, 19 ऑक्टोबर : ‘माझं तिच्यावर प्रेम होतं. मात्र, तिनेच मला लुटले. आता मला तिला पुन्हा भेटायचे नाही. जयपूरमधील अनिवासी भारतीय व्यापारी नितीन उपाध्याय (52) यांनी हे शब्द त्यांच्या पत्नीसाठी वापरले आहेत. नितीन यांनी त्यांची डॉक्टर पत्नी अमिता उपाध्याय (34) हिच्यावर असे गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप ऐकल्यावर पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी मोती डुंगरी पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. संपूर्ण प्रकरण काय - पोलिसांच्या अहवालानुसार, नितीन हे एनआरआय/ओसीआय नागरिक आहेत. त्यांचा जन्म उज्जैन येथे झाला. ते दोन वर्षांचे असताना वडिलांसोबत अमेरिकेला गेले. नितीनचे वडील अमेरिकेत डॉक्टर होते, जिथे त्यांचे प्रॉपर्टीसह अनेक व्यवसाय आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नितीनने वडिलांच्या हॉटेलसह सर्व व्यवसाय सांभाळला. दरम्यान, 2006 मध्ये त्यांनी अमिता नावाच्या महिला डॉक्टरशी लग्न केले. यानंतर तो मोतीडुंगरी येथे पत्नी आणि 15 वर्षाच्या मुलासह राहत होता. उद्योगपती नितीन यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीने कालसर्प दोषाचा धाक दाखवून त्यांच्याकडून करोडो रुपये चोरले. संगणक ऑपरेटर शिव पुरुषोत्तम आणि 2008 मध्ये त्यांच्या कंपनीत रुजू झालेले नोकर ऋषी सक्सेना यांचाही या कटात सहभाग होता. मांत्रिकाशीही भेट घालून दिली - दरम्यान, याप्रकरणी नितीन यांनी सांगितले की, 27 मार्च 2006 रोजी अमिता यांच्या लग्नाला जवळपास वर्षभरानंतर मुलगा झाला. लग्नानंतर सुनेचे वागणे पाहून आई-बाबांनी स्वत: ला आमच्यापासून दुरी तयार करुन घेतली. मी व्यवसायानिमित्त भारताबाहेर येत राहिलो. आयुष्यात सर्व काही छान चालले होते. काही काळानंतर सांगानेर येथे राहणारे शिव पुरुषोत्तम यांना प्रॉपर्टीच्या व्यवसायासाठी नोकरीवर घेण्यात आले. माझ्या आयुष्यातील एका वाईट टप्प्याची ही सुरुवात झाली. शिव पुरुषोत्तमने पत्नीसह पैसे आणि मालमत्ता हडप करण्याचा कट रचला. पत्नीची जुनी ओळख असलेला ऋषी सक्सेनाही त्यात सामील झाला. ‘पत्नीने मला काल सर्प दोषाची भीती दाखवली आणि माझी ओळख एका तांत्रिकाशी करून दिली. तांत्रिक बाबाचा प्रसाद सांगून मला स्लो पॉयझन मिसळलेले गुलाबाचे फुल खाऊ घातले. तसेच माझ्याकडून एक कोटी रुपये हिसकावण्यात आले. इतकेच नाही तर कालसर्पकडून मृत्यूची भीती दाखवून मला परत अमेरिकेला पाठवले. भारतात गुंतवणुकीच्या नावाखाली पत्नीने माझ्याकडून करोडो रुपये घेतले. स्लो पॉयझन दिल्याने आज ही परिस्थिती आहे, त्यामुळे मला नीट चालताही येत नाही. 40 टक्के शरीर निरुपयोगी झाले आहे, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली. हेही वाचा - भंडारा : एक्स गर्लफ्रेंडच्या सततच्या त्रासाला कंटाळला तरुण; जंगलातच घेतला गळफास नितीनने सांगितले की, ‘माझी मालमत्ता फसव्या मार्गाने विकल्याबद्दल मी शिव पुरुषोत्तम यांच्याविरोधात मुहाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक करून कारागृहात रवानगी करून चालान सादर केले. तेव्हापासून पत्नीशी वाद सुरू झाला. रोज मारामारी सुरू झाली आणि बायकोचे भांडण झाले. 2020 मध्ये ती घर सोडून निघून गेली. या संपूर्ण प्रकरणात पत्नी डॉक्टर अमिता उपाध्याय यांनीही मीडियासमोर आपली बाजू मांडली आहे. अमिता म्हणाली की, मला यामध्ये काहीही देणेघेणे नाही. शिव पुरुषोत्तम यांनी मालमत्ता विकण्याचा कट रचला, तो तुरुंगात आहे. शिव पुरुषोत्तम आम्हा दोघांना स्लो पॉयझन द्यायचा. नितीनलाही याची माहिती आहे. त्याचे मेडिकल झाले, माझे नाही. आमचा घटस्फोटाचा खटला दोन वर्षांपासून सुरू आहे. म्हणूनच मी वेगळी राहत आहे, असेही ती म्हणाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.