• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • तीन तलाक देऊ शकला नाही म्हणून व्यक्तीने 5 महिन्यांच्या गर्भवती पत्नीसोबत केला धक्कादायक प्रकार

तीन तलाक देऊ शकला नाही म्हणून व्यक्तीने 5 महिन्यांच्या गर्भवती पत्नीसोबत केला धक्कादायक प्रकार

त्याने आपल्या गर्भवती पत्नीसोबत भयंकर कृत्य केलं.

 • Share this:
  हरियाणा, 17 ऑक्टोबर : हरियाणातील (Haryana News) यमुनानगरमध्ये 5 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या (Murder) करणारा आरोपी रेल्वे पोलिसात सब इन्स्पेक्टर पदावर असल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. पत्नीला आपल्या रस्त्यातून हटवण्यासाठी तिचा अपघात करीत त्याला दुर्घटनेचं रुप देण्याचा प्रयत्न केला होता. यमुनानगर पोलीस अधीक्षक कमलदीप गोयल यांनी सांगितलं की, हे प्रकरण सोडवण्याची जबाबदारी यमुनानगर -1 ला सोपवण्यात आली आहे. त्यांनी कारवाईदरम्यान या अपघाताचा खुलासा केला. पोलीस टीमने हत्या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी रेल्वे पोलिसातच सब इन्स्पेक्टर पदावर तैनात होता. चुलत भाऊ आणि मित्रांच्या मदतीने केलं घृणास्पद कृत्य अफसर अली नावाच्या रेल्वे पोलिसांनी सब इन्स्पेक्टरवर आरोप केले आहेत की, त्याने आपल्या पाच महिन्याच्या गर्भवती पत्नी (Plan to kill Najma five-month-pregnant wife) नजमा हिच्या हत्येचा प्लान आखला. यासाठी त्याने चुलत भावाची मदत घेतली. रस्ते अपघाताच्या नावाने व्यक्तीने आपल्याच पत्नीची हत्या घडवून आणली. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर याचा खुलासा झाला. ज्या गाडीने नजमा हिचा अपघात झाला होता, ती कार उत्तर प्रदेशातील गावातील असल्याचं समोर आलं. अलीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. हे ही वाचा-लेफ्टनंट कर्नल महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण;ब्रिगेडीयरचं कनेक्शन समोर रेल्वे पोलिसातील सब इन्स्पेटर अफसर अली यांची नजमाची फेसबुकवर ओळख झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. त्यांच्यात शरीरसंबंधही झाले होते. मात्र अफसर अली याला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचू नये यासाठी अफसर अली याला 2019 मध्ये नजमा हिच्यासोबत लग्न करावं लागलं. यादरम्यान तीन तलाक कायदा आल्याने अफसर अली नजमा हिला सोडू शकला नाही. यानंतर त्याने आपला चुलत भाऊ आणि अन्य दोन मित्रांच्या मदतने आपल्या 5 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या करण्याचा प्लान केला. पत्नीला बाहेर फिरायला म्हणून घेऊन गेला आणि तिचा अपघात घडवून आणला. पतीने आपल्या पत्नीच्या स्कॉर्पिओ गाडीने अपघात घडलून जीवे मारले.
  Published by:Meenal Gangurde
  First published: