मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Surat News: एकतर्फी प्रेमात वेड्या तरुणाचं भयंकर कृत्य, भरदिवसा तरुणीचा गळा चिरला, हत्येचा LIVE VIDEO व्हायरल

Surat News: एकतर्फी प्रेमात वेड्या तरुणाचं भयंकर कृत्य, भरदिवसा तरुणीचा गळा चिरला, हत्येचा LIVE VIDEO व्हायरल

भयंकर! एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा चिरला, मदतीसाठी ती बोलावत होती पण... घटनेचा VIDEO व्हायरल

भयंकर! एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा चिरला, मदतीसाठी ती बोलावत होती पण... घटनेचा VIDEO व्हायरल

एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा या तरुणाने तरुणीचा गळा चिरला आहे. यानंतर आरोपीने स्वत: देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

सुरत, 13 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन डे पूर्वी एक खळबळजनक आणि अत्यंत धक्कादायक (shocking incident) अशी घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीची निर्घृणपणे हत्या (brutally murder in one side love) केली आहे. भरदिवसा तरुणीचा गळा चिरला. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद (shocking incident caught in mobile camera) झाली आहे. सुरतमधील (Surat) कामरेज येथील पसोदरा येथे ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही दृश्य पाहून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरतमधील कामरेज येथील ही घटना आहे. एका तरुणाने भरदिवसा तरुणीचा गळा चिरून तिचा निर्घृणपणे खून केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून या तरुणीचा पाठलाग करत होता. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी तरुणीच्या काकांनी या तरुणाला खडसावले सुद्धा होते. घटनेच्या दिवशी या तरुणाने या तरुणीच्या घराबाहेर जाऊन गोंधळ घातला.

यानंतर एकतर्फी प्रेमात वेडा झालेल्या या तरुणाने प्रेयसीच्या भाऊ आणि वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर मैत्रिणीच्या गळ्यावर चाकू ठेवून या तरुणीला घराबाहेर काढलं. मग भरदिवसा सर्वांसमोर या तरुणाने त्या तरुणीचा गळा चिरला.

वाचा : बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठा फ्रॉड, गुजराती व्यावसायिकाकडून 22,842कोटींचा चुना

मदतीसाठी आरडा-ओरड पण...

ज्यावेळी या तरुणाने तरुणीला पकडून तिच्या गळ्याजवळ चाकू धरला होता. त्यावेळी ही तरुणी मदतीसाठी आरडाओरड करत होती. या तरुणाला समजावण्याचा शेजाऱ्यांनी प्रयत्न केला. पण एकतर्फी प्रेमात वेडा झालेल्या या तरुणाने अखेर तिचा गळा चिरला.

आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

तरुणीचा गळा चिरल्यानंतर आरोपीने स्वत: देखील हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भरदिवसा एका मुलीचा गळा चिरुन हत्या केल्याच्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसेच परिसरात संतापाची लाट पसरली आहे. असे कृत्य करणाऱ्या या तरुणाला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

कोल्हापुरात पत्नीची धारदार शस्त्राने हत्या, ती आक्रोश करत होती अन् लोक शूट करत होते

काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक वृत्त समोर आलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे ज्यावेळी आरोपी पत्नीची हत्या करत होता त्यावेळी शेजारी नागरिक उपस्थित होते आणि त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेत व्हिडीओ शूट केला. ही हत्या होत असल्याचा live video आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हत्येच्या या व्हिडीओने एकच खळबळ उडाली आहे

First published:
top videos

    Tags: Crime, Live video viral, Murder, Surat