Home /News /maharashtra /

Kolhapur: पत्नीची धारदार शस्त्राने हत्या; ती आक्रोश करत होती अन् लोक शूट करत होते, हत्येचा LIVE VIDEO VIRAL

Kolhapur: पत्नीची धारदार शस्त्राने हत्या; ती आक्रोश करत होती अन् लोक शूट करत होते, हत्येचा LIVE VIDEO VIRAL

कोल्हापुरातील हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पतीने धारदार शस्त्राने आपल्या पत्नीची हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. (Kolhapur man murdered wife, video viral)

    कोल्हापूर, 29 जानेवारी : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातून एक खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या (murder) केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे ज्यावेळी आरोपी पत्नीची हत्या (wife brutally killed) करत होता त्यावेळी शेजारी नागरिक उपस्थित होते आणि त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेत व्हिडीओ शूट केला. ही हत्या होत असल्याचा live video आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हत्येच्या या व्हिडीओने एकच खळबळ उडाली आहे. (Kolhapur man killed wife, murder live video goes viral in social media) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 25 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. आरोपी इम्तियाज नदाफ याने आपली पत्नी समिना हिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पत्नीवर धारदार शस्त्राने वार करुन आरोपी इम्तियाज याने घटनास्थळावरुन पळ काढला. पण पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी इम्तियाज नदाफ याने दारुच्या नशेत पत्नीवर हल्ला केला. धारदार शस्त्राने हल्ला केल्याने पत्नी समिना गंभीर जखमी झाली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा अखेर मृत्यू झाला. आरोपी इम्तियाज हा समिनाच्या वडिलांच्या गाड्यावर गेला होता. समिना तेथे होती. यावेळी दोघांत झालेल्या वादानंतर इम्तियाजने तिच्यावर हल्ला केला. समिना आपले प्राण वाचवण्यासाठी पळू लागली आणि शेजारील दुकानात शिरली. यावेळी इम्तियाजने तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन तिची हत्या केली. वाचा : हातोड्यानं केली पतीची हत्या, आरोपी पत्नीला सोडून दिलं पोलिसांनी; हे आहे कारण धक्कादायक म्हणजे ज्यावेळी ही घटना घडत होती त्यावेळी तेथे उपस्थित असलेले नागरिक केवळ बघ्याची भूमिका घेत होते. पीडित समिना मदतीसाठी आरडाओरड करत होती पण कुणीही तिच्या मदतीसाठी धावून आलं नाही उलट तिचा पती धारदार शस्त्राने वार करत असताना नागरिक मोबाइलमध्ये शूट करत होते. जर वेळीच तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी समिनाच्या मदतीसाठी धाव घेतली असती. तर आज समिना जिवंत असती. या घटनेमुळे आता माणसातली माणुसकी मेली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 'तुला खल्लास करतो' म्हणत तरुणीच्या डोक्यात घातला हातोडा पुण्यातील तळेगाव येथून एक खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीच्या डोक्यात एका तरुणाने हातोडा मारुन जीवघेणा हल्ला केला आहे. गुरुवारी ही घटना घडली आहे. पोलिसांत छेडछाडीची तक्रार केल्याचा राग मनात धरुन आरोपीने या मुलीवर हातोडीने हल्ला केला. गुरुवारी सायंकााळच्या सुमारास साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलगी ही 17 वर्षीय आहे. या मुलीने काही दिवसांपूर्वी आरोपी शिवम शेळके याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. आरोपी छेडछाड करत असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. याचाच राग मनात धरुन आरोपीने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Kolhapur, Murder

    पुढील बातम्या