बिजनोर, 7 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यात पोलिसांनी न घाबरता भररस्त्यात एका तरुणावर गोळ्या घालण्यात आल्या. इतकच नाही तर हा गुन्हा केल्यानंतर पुढील अर्धा तास आरोपी पोलिसांची प्रतीक्षा करीत घटनास्थळी उभे राहिले. सर्वात धक्कादायक म्हणजे पोलीस आल्यानंतर ते लोकांना हा व्हिडिओ यूट्यूब शेअर करण्याचं आवाहन करीत होते. पोलिसांनी घटनास्थळावरील 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. हा प्रकार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. गुन्हा केल्यानंतर सर्वसाधारणपणे आरोपी तेथून पळ काढतात. मात्र हे चौघेही अर्धा तास तेथेच थांबून राहिले. तितका वेळ ते रस्त्यावर फेऱ्या मारत होते.
ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. सांगितलं जात आहे की, एक 27 वर्षांचा तरुण बाजारात खरेदी करण्यासाठी गेला होता. यादरम्यान त्याच्याच परिसरात राहणारे 6 जणांनी तरुणावर गोळ्या घातल्या. यावेळी तरुण जीव वाचवण्यासाठी एका दुकाने शिरला. मात्र आरोपींनी दुकानावर गोळ्या झाडत त्याची हत्या केली.
हे ही वाचा-घटस्फोटीत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; 6 वर्षांची चिमुरडी आईसाठी करतेय आक्रोश
पोलिसांची वाट पाहत होते आरोपी
आरोपींनी तरुणावर गोळीबार केल्यानंतर घटनास्थळी थांबून राहिले. सांगितलं जात आहे की, पुढील अर्धा तास ते घटनास्थळावर फिरत होते. पोलीस येताच आरोपींना सरेंडर केलं. पोलीस त्या चारही आरोपींना सोबत घेऊन जात असताना त्यांच्या चेहऱ्यावर अजिबातच तणाव नव्हता. उलटपक्षी बाईकवर बसत असताना त्यांनी आजूबाजूच्या लोकांना हा व्हिडिओ यूट्यूबवर यायला हवा, अशीच धमकी दिली.
हा प्रकार पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. एसपी.डॉ. धर्मवीर सिंह म्हणाले की, या प्रकरणात आरोपी शारिक, शादाब, शहनाज आणि शहबाज यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे बंदुकाही सापडल्या आहेत. मात्र दरम्यान एक आरोपी घटनास्थळाहून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Uttar pradesh, Youtube