हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन अन् इमारतीत सुरू होती देहविक्री, अखेर 2 तरुणीसह महिलेची सुटका

हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन अन् इमारतीत सुरू होती देहविक्री, अखेर 2 तरुणीसह महिलेची सुटका

पुणे-सोलापूर महामार्गाच्या शेजारी असणाऱ्या रहिवासी इमारतीमध्ये अवैधपणे वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली.

  • Share this:

इंदापूर, 25 डिसेंबर : भिगवण शहरातील गजबजलेल्या रहिवासी परिसरात अवैधपणे चालवल्या जाणाऱ्या कुंटणखाण्यावर (Sex Racket) भिगवण पोलिसांनी (Bhigwan police) छापा टाकीत दोन पीडित महिलांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत रोख रक्कमेसह 28 हजार 500 रुपयांचा जप्त केला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांना गोपनीय सूत्राकडून पुणे-सोलापूर महामार्गाच्या शेजारी असणाऱ्या रहिवासी इमारतीमध्ये अवैधपणे वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे माने यांनी पोलिसांच्या एका पथकाची नियुक्ती करत या ठिकाणी तातडीने छापा टाकला. यावेळी आरोपी मिनीनाथ रमेश गायकवाड (वय 28 राहणार मदनवाडी मुळ, भगतवाडी तालुका करमाळा) रोहिदास गंगाराम दराडे (वय 29) राहणार अकोले हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 20 वर्षांची तरुणी आणि 40 वर्षांची महिला यांच्याकडून अवैधपणे कुंटणखाना चालवीत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी दोन महिलांची सुटका करत दोन्ही आरोपींना अटक केली. यावेळी आरोपी वापरत असलेले मोबाईल आणि रोख रक्कम मिळून 28 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला.

'पाकिस्तान आणि ब्रिटनमध्ये अब्जावधी पौंडाचा ‘डर्टी’ व्यवहार!'

सदर कारवाई पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्यासह पोलीस हवालदार दत्तात्रय खुटाळे, नाना वीर, इंकलाब पठाण, महिला पोलीस नाईक सारिका जाधव या पथकाने केली.

'शेतकरी थंडीत गारठले, कृषी कायदा मागे घ्या' संसदेत मोदींसमोरच घोषणाबाजी, VIDEO

पुणे-सोलापूर महामार्गावरील गजबजलेल्या रहिवासी भागात सुरू असलेल्या या व्यवसायाची माहिती या परिसरातील नागरिकांना नव्हती, हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. तर हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असताना याठिकाणी अवैध व्यवसाय चालवणाऱ्या आरोपींची मानसिकता नेमकी काय? याचा उलगडा होत नाही.

Published by: sachin Salve
First published: December 25, 2020, 12:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading