Home /News /videsh /

'पाकिस्तान आणि ब्रिटनमध्ये अब्जावधी पौंडाचा ‘डर्टी’ व्यवहार', ब्रिटीश रिपोर्टमधून माहिती उघड

'पाकिस्तान आणि ब्रिटनमध्ये अब्जावधी पौंडाचा ‘डर्टी’ व्यवहार', ब्रिटीश रिपोर्टमधून माहिती उघड

“National Risk Assessment of money laundering and terrorist financing 2020" असं या अहवालाचं शीर्षक असून ब्रिटनमधल्या गृह आणि अर्थ विभागाने तो तयार केला आहे.

    लंडन, 25 डिसेंबर :  जगभरातील दहशतवाद्यांचं आश्रयस्थान म्हणून पाकिस्तानची (Pakistan) ओळख आहे.  ओसामा बिन लादेन (Osama Bin Laden ) पाकिस्तानातच लपला होता. भारतावर झालेल्या 26/11 सह अनेक दहशतवादी हल्ल्यांचे मास्टरमाईंड हे पाकिस्तानात अगदी उघडपणे फिरतात. पाकिस्तानचा वापर हा फक्त दहशतवाद्यांचा तळ म्हणून म्हणून नाही तर ‘डर्टी मनी’ (Dirty Money) पुरवण्याचे केंद्र म्हणूनही होत असल्याची माहिती ब्रिटनमध्ये  प्रकाशित झालेल्या एका अहवालात देण्यात आली आहे. पाकिस्तान आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये होत असलेल्या ‘डर्टी मनी’ व्यवहारावर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. काय आहे अहवालात? “National Risk Assessment of money laundering and terrorist financing 2020" असं या अहवालाचं शीर्षक असून ब्रिटनमधल्या गृह आणि अर्थ विभागाने तो तयार केला आहे. ‘पाकिस्तान आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये घट्ट आर्थिक नेटवर्क आहे. या दोन देशांमध्ये 2017 साली तब्बल 1.7 अब्ज पौंड व्यवहार झाला होता’, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे. (हे वाचा-ब्रिटन-फ्रान्स सीमेलगत अडकलेल्या ट्रक ड्रायव्हर्सना शीख बांधवांनी पोहोचवलं जेवण) या दोन देशांमधील घट्ट आर्थिक आणि सांस्कृतिक नात्यांचा या व्यवहारात उपयोग केला जातो. पाकिस्तान आणि ब्रिटन या दोन्ही देशांमधील ‘हाय प्रोफाईल’ (High Profile) मंडळींनी डर्टी मनीचा वापर करुन एकमेकांच्या देशात मोठ्या प्रमाणात संपत्ती खरेदी केली आहे,’ अशी माहिती देखील या अहवालात देण्यात आली आहे. कोणत्या संपत्तीची होते खरेदी? दोन्ही देशांमधील गुन्हेगारी प्रवृत्तींची मंडळी रिअल इस्टेट (Real Estate), मौल्यवान दागिने, रत्नं खरेदी करण्यासाठी या संपत्तीचा वापर करतात. त्याचबरोबर भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांच्या व्यापारातही हा ‘डर्टी मनी’ वापरला जातो, अशी धक्कादायक माहिती या अहवालामुळे उघड झाली आहे. ब्रिटनमधील नॅशनल क्राईम एजन्सी (NCA) ने ब्रिटन आणि पाकिस्तान यांच्यात बेहिशेबी संपत्तीचे हस्तांतरण कशा पद्धतीनं सुरु आहे, हे सांगण्यासाठी एक उदाहरण दिले आहे. डिसेंबर 2019 मध्ये पाकिस्तानी नागरिक असलेल्या एका अब्जाधीश व्यक्तीची सुमारे 190 अब्ज पौंड संपत्तीचं ब्रिटनमधून पाकिस्तानात हस्तांतरण करण्यात आले होते. ‘दोन्ही देशांमधील सरकारी यंत्रणांच्या सहभागाशिवाय इतकी मोठी रक्कम पाकिस्तानात पाठवली जाऊ शकत नाही,’ असा दावा NCA नं केला आहे. (हे वाचा-आश्चर्यकारक! जगभरातील 40 हून जास्त देशांमध्ये साजरा करत नाहीत 'ख्रिसमस') दुसऱ्या देशांमधील गुप्तता कायद्याचा आधार घेऊन स्थापन करण्यात आलेल्या संशायास्पद कंपनींचे आर्थिक व्यवहार तपासणे हे शक्य होत नाही. त्यामुळे या पैशांचा मालक नेमका कोण आहे? हे शोधणे कठीण असल्याची अडचण या अहवालात मांडण्यात आली आहे. पाकिस्तान पूर्वीपासूनच बदनाम टेरर फंडिंग आणि डर्टी मनीच्या व्यवहाबद्दल पाकिस्तान  बदनाम आहे. युरोपीयन युनियननं पाकिस्तानचा ‘डर्टी मनी ब्लॅकलिस्ट’च्या सूचीत यापूर्वीच समावेश केला आहे. पाकिस्तान आणि ब्रिटनमधील डर्टी मनीचे व्यवहार रोखण्यासाठी दोन्ही देशांमधील यंत्रणांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानसह युएई, रशिया आणि हाँगकाँग हे देश ब्रिटनमध्ये होणाऱ्या ‘डर्टी मनी’ व्यवहाराचे हॉट स्पॉट असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pakistan

    पुढील बातम्या