जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'शेतकरी थंडीत गारठले, कृषी कायदा मागे घ्या' संसदेत मोदींसमोरच घोषणाबाजी, VIDEO

'शेतकरी थंडीत गारठले, कृषी कायदा मागे घ्या' संसदेत मोदींसमोरच घोषणाबाजी, VIDEO

'शेतकरी थंडीत गारठले, कृषी कायदा मागे घ्या' संसदेत मोदींसमोरच घोषणाबाजी, VIDEO

पंतप्रधान मोदी यांच्यासमोरच कृषी कायद्याबद्दलचे पोस्टरही झळकावले. संसदेच्या सेंटर हॉलमध्ये घोषणाबाजी झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 डिसेंबर : कृषी कायदा मागे घेण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर महिन्याभरापासून शेतकरी आंदोलन (farmer Protest) करत आहे. आता हे आंदोलन थेट संसदेत धडकले आहे. आम आदमी पक्षाच्या (AAP) नेत्यांनी संसदेच्या सेंटर हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या समोरच जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या सेंटर हॉलमध्ये आले होते. त्यावेळी आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी कृषी कायदा मागे घ्या, अशा जोरदार घोषणा दिल्या.

जाहिरात

पंतप्रधान मोदी यांच्यासमोरच कृषी कायद्याबद्दलचे पोस्टरही झळकावले.  संसदेच्या सेंटर हॉलमध्ये घोषणाबाजी झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान, केंद्र सरकारने गुरुवारी आंदोलनातील शेतकरी संघटनांना रखडलेली चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी निमंत्रण धाडले आहे. तसंच तीन नवीन कृषी कायद्यांबाबत असणाऱ्या विरोध संपवण्यासाठी त्यांच्या सोयीने चर्चेसाठी तारीख निवडायला सांगितले आहे. पण शेतकरी संघटनांनी असा आरोप केला आहे की, सरकारचे आताचे पत्र हे केवळ शेतकऱ्यांविरोधात असा प्रचार करणे आहे की त्यांना चर्चा करण्यात रस नाही आहे. 40 शेतकरी संघटनांचा सहभाग असणारी ‘संयुक्त किसान मोर्चा’ शुक्रवारी केंद्राबरोबर बैठक करण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या सीमाभागात ते गेल्या 27 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या बैठकीदरम्यान केंद्राच्या पत्राबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात