मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कॉलेजने आखला विद्यार्थ्यांसह रायरेश्वरावर ट्रेकिंगचा प्लान; रस्त्यातच 17 वर्षीय शुभमचा हार्ट अटॅकने दुर्देवी मृत्यू

कॉलेजने आखला विद्यार्थ्यांसह रायरेश्वरावर ट्रेकिंगचा प्लान; रस्त्यातच 17 वर्षीय शुभमचा हार्ट अटॅकने दुर्देवी मृत्यू

पुणे : अवघ्या 17 वर्षांच्या शुभम प्रदीप चोपडे याचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबावर संकट कोसळलं आहे.

बारामती, 29 जुलै : बारामतीहून रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा रस्त्यातचं दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रायरेश्वर किल्ल्यावर जाताना कोर्ले येथे आला असताना त्याला अचानक हृदय विकाराचा झटका आल्याने वाटेतच त्याचा मृत्यू झाला. शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातील 46 विद्यार्थी आणि शिक्षक रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगला गेले होते. यातील एकाचा वाटेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शुभम प्रदीप चोपडे असं मृत्यू झालेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. शुभम हा मूळचा करमाळा तालुक्यातील उंब्रट गावचा विद्यार्थी आहे. त्याच्या मृत्यूनंतर गावभरात शोककळा पसरली. बारामती येथील शारदाबाई पवार महाविद्यालयात शिकत असलेला शुभम प्रदीप चोपडे या 17 वर्षाच्या विद्यार्थ्यांचा भोर तालुक्यातील रायरेश्वर येथे ट्रेकिंग करण्यासाठी गेला असताना हृदयविकाराचा तीव्र झटक्याने या मुलाचा मृत्यू झाला आहे. तो 12 वीत सायन्स या शाखेत शिकत होता. आज सकाळी बारामतीहून किल्ले रायरेश्वर येथे विद्यालयातील 46 विद्यार्थी व शिक्षक ट्रेकिंगसाठी गेले असताना सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास शुभम चोपडे हा मित्रासमवेत ट्रेक करीत असताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने शुभम याचा मृत्यू झाला. यानंतर शुभमला जवळच असणाऱ्या प्राथमिक केंद्र अंबवडे तालुका भोर या ठिकाणी उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच शुभम याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शुभम हा करमाळा तालुक्यातील उंब्रट गावचा मूळ रहिवाशी असून बारामतीत तो शिक्षणासाठी आला होता. त्याच्या या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
First published:

Tags: Heart Attack, Pune (City/Town/Village), School

पुढील बातम्या