मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

रोजच्या आयुष्यातील ‘या’ सवयी ठरू शकतात घातक, उशीर होण्यापूर्वीच व्हा सावध!

रोजच्या आयुष्यातील ‘या’ सवयी ठरू शकतात घातक, उशीर होण्यापूर्वीच व्हा सावध!

सध्या आपली जीवनशैली (Lifestyle) खूप बदलली आहे. अनेक प्रकारच्या ताणतणावांना आपल्याला रोज सामोरं जावं लागत आहे.

सध्या आपली जीवनशैली (Lifestyle) खूप बदलली आहे. अनेक प्रकारच्या ताणतणावांना आपल्याला रोज सामोरं जावं लागत आहे.

सध्या आपली जीवनशैली (Lifestyle) खूप बदलली आहे. अनेक प्रकारच्या ताणतणावांना आपल्याला रोज सामोरं जावं लागत आहे.

मुंबई, 28 जुलै :  सध्या आपली जीवनशैली (Lifestyle) खूप बदलली आहे. अनेक प्रकारच्या ताणतणावांना आपल्याला रोज सामोरं जावं लागत आहे. त्यातच कामाची पद्धत, खाणंपिणंही बदललं आहे. या जीवनशैलीमुळे लागलेल्या अनेक सवयींमुळे शरीरातील हॉर्मोन्सचं संतुलनही (Hormonal Imbalance) बिघडत आहे. मोठ्या डुलक्या (Long Naps), अवेळी खाणं (Irregular Meal Timimgs), नॉनस्टिक भांड्यांचा स्वयंपाकासाठी (Nonstick Cookware) वापर यामुळे हे वाईट परिणाम होत असल्याचं आयुर्वेद तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 'हिंदुस्थान टाईम्स'च्या वेबसाईटवर याबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे.

काय बदल होतात?

सर्व वयाच्या लोकांमध्ये हॉर्मोन्सचं असंतुलन असल्याचं लक्षात आलं आहे. विशेषत: तारुण्यात पदार्पण करताना (Puberty), मासिक पाळी सुरु होताना (Menstruation), गरोदरपणा, मेनोपॉज, वृद्धपकाळ अशा टप्प्यांवर तर हे असंतुलन विशेषत्वाने जाणवतं. सदोष लाईफस्टाईलमुळे हॉर्मोन्सवर परिणाम होतो आणि अनेक जुनाट रोग जडतात, हे तुम्हाला माहिती आहे का? ताण, जास्त काळ बैठं काम किंवा एकाच जागी बसून राहणं, चरबीयुक्त पदार्थ खाणं आणि अपुरी झोप यामुळे हॉर्मोन्सचं संतुलन बिघडतं आणि अर्थातच त्याचा आरोग्यवरही परिणाम होतो. किंबहुना आरोग्याच्या अनेक समस्या त्यामुळे उद्भवतात.

एन्डोक्राईन ग्लॅंड्समध्ये (Endocrine Glands) स्रवणारी रसायनं म्हणजे हॉर्मोन्स. शरीरातील महत्त्वाच्या कार्यांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये या ग्रंथी महत्त्वाची भूमिका बजावतात. चयापचय क्रिया, वाढ, पुनर्निमिती, लैंगिक आरोग्य, मूड्स, त्वचा आणि केसांचं आरोग्य आणि अगदी झोपेसारख्या महत्त्वाच्या कार्यांवर नियंत्रण ठेवण्यास या 50 पेक्षा जास्त ग्लँड्स म्हणजे ग्रंथी मदत करतात. शरीरातील हॉर्मोन्सचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त झालं तर हॉर्मोन्सचं असंतुलन झालं असं समजलं जातं. त्यानंतर थायरॉईड, पीसीओडी, डायबेटिस, ॲकने ते अगदी वंध्यत्वापर्यंतचे आजार या असंतुलनामुळे होतात.

काय आहेत लक्षणं?

- हॉर्मोन्सचं असंतुलन झालं आहे हे आपल्याला कसं समजतं? अचानकपणे वजन वाढल्यास किंवा कमी झाल्यास, थकवा, बधिरपणा किंवा हातापायांना मुंग्या येणं, कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त वाढणं, नैराश्य किंवा अस्वस्थपणासारख्या मानसिक समस्या ही हॉर्मोन्सचं असुंतलन झाल्याची लक्षणं आहेत.

लाईफस्टाईलमधील अनेक गोष्टी तुमच्या हॉर्मोन्सवर परिणाम करतात. हॉर्मोन्सचं संतुलन राखण्यासाठी काही गोष्टी टाळणं आवश्यक आहे.

- आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर हॉर्मोन्सचं संतुलन राखण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. या गोष्टी टाळल्या तर हॉर्मोन्सचं असंतुलन होणार नाही.

1. रिकाम्या पोटी कॉफी पिणं

सकाळी-सकाळी मस्त कॉफी पिऊन मगच तुमच्या दिवसाची सुरुवात होते का? मात्र रिकाम्यापोटी म्हणजे काहीही खाल्लेलं नसताना कॅफेनचं सेवन (Coffee on Empty Stomach ) करणं ही कदाचित तुमच्या चयापचयासाठीची सर्वांत धोकादायक गोष्ट असू शकते. त्यामुळे आतड्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात किंवा हॉर्मोन्सचे आजार होऊ शकतात. तेव्हा सकाळी उपाशी पोटी कॉफी पिणं टाळा.

2 . जेवणाच्या ठराविक वेळा नसणं

हॉर्मोन्सचं संतुलन आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी जेवणाच्या वेळा ठरवणं आणि त्या काटेकोरपणे पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही वेळीअवेळी जेवत असाल तर त्यामुळे तुमची आतडी गोंधळात पडतात आणि digestive enzymes आणि पचनासाठीचे हॉर्मोन्स (ghrelin and leptin) यांच्या स्रवण्यावर याचा परिणाम होतो. पित्त, गॅस, पोट वाढणं, ब्लोटिंग, आतड्यांना चिरा जाणं, IBS, इ. आजारांमागे हे मुख्य कारण असतं. त्यामुळे शक्यतो जेवणाच्या वेळा नक्की करा आणि त्या पाळण्याचा प्रयत्न करा.

अतिप्रमाणात साखर खाणं, दारु पिणं, प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं, मांसाहाराचा अतिरेक, शिळे किंवा तळलेले पदार्थ जास्त खाणं, आंबवलेले पदार्थ, ग्लुटेन आणि दुग्धजन्य पदार्थ अति खाणं यामुळे जळजळ वाढते आणि त्यामुळे तुमच्या हॉर्मोन्सवर वाईट परिणाम होतो. तुम्ही जे खाता, जे तुम्हाला पचतं, तसंच तुमचं व्यक्तिमत्व बनतं. वर सांगितलेल्या पदार्थांचं सेवन मर्यादित प्रमाणात केल्यामुळे हॉर्मोन्सच्या संतुलनात 70% सुधारणा होते.

4. ताण

अस्वस्थ मन आणि शरीर यामुळे cortisol म्हणजे Stress Hormones मध्ये वाढ होऊ शकते. यामुळे शरीरातील अन्य हॉर्मोन्सवरही परिणाम होतो. दुसरीकडे मन शांत ठेवल्याने (प्राणायामाच्या मदतीने) हॉर्मोन्सचं संतुलन चांगलं राखलं जातं.

5. अपुरी झोप

जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेता तेव्हा तुमच्या लिव्हर म्हणजे यकृतातून विषारी रसायनं बाहेर टाकली जातात आणि त्यामुळे तुमचं मन आणि शरीर स्वस्थ राहतं. जितकी चांगली झोप तितक्या लवकर तुम्ही बरे होता. अपुरी झोप किंवा झोपेत वारंवार व्यत्यय येण्याने तुमच्या हॉर्मोन्सचं संतुलन बिघडतं आणि त्यामुळे आतड्यांचे आजार होऊ शकतात. तसंच हे लठ्ठपणा, मासिक पाळीतील अनियमितता यांनाही आमंत्रण देणारं ठरू शकतं.

6. दिवसा झोपणं

तुम्हाला दुपारी थोडावेळ तरी डुलकी घेण्याची सवय आहे का? दुपारी झोपल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही का? तर मग याचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणामम होतो. दुपारी दुपारी 30-40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोपल्याने शरीरातील कफदोष वाढतो. यामुळे पचनक्रिया मंदावते. पचनक्रिया मंदावणं हे अनेक आजारांमागे मुख्य कारण असल्याचं आयुर्वेदात म्हटलं आहे. त्यामुळे शक्यतो रोज दुपारी झोपणं टाळा.

7. बैठी जीवनशैली

व्यायाम न केल्यास वजन वाढतं, त्यामुळे पचनक्रिया मंदावते, शरीराची हालचाल कमी असल्यास तसंच आळशीपणामुळे पचनक्रियेशी संबंधित आजार होतात आणि हॉर्मोन्सचं असंतुलन वाढतं.

8. प्लॅस्टिक, ॲल्युमिनियम किंवा नॉनस्टिक भांड्याचा जास्त वापर

प्लॅस्टिक, ॲल्युमिनियम किंवा नॉनस्टिक भांड्यांमध्ये BPA म्हणजेच Bisphenol A , phthalates आणि parabens ही अत्यंत हानीकारक रसायनं असतात. त्यामुळे या भांड्यांचा अतिवापर टाळावा. त्याऐवजी स्टील,लोखंड हे धातू तसेच काच, मातीच्या भांड्यांचा वापर स्वयंपाकासाठी जास्त केला जावा.

या अगदी साध्यासोप्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला रोजच्या अत्यंत बिझी शेड्युलमधूनही करता येऊ शकतात. पण या केल्यास आपल्या आरोग्यावर त्याचे सकारात्मक परिणाम होतात हे नक्की.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle