मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

आधी बेदम मारहाण, मग धारदार शस्त्रानं तोडले तरुणाचे हात; कारण ऐकून बसेल धक्का

आधी बेदम मारहाण, मग धारदार शस्त्रानं तोडले तरुणाचे हात; कारण ऐकून बसेल धक्का

सरपंच पतीची कॉलर पकडल्याची शिक्षा एका युवकाला अत्यंत क्रूरपणे दिली गेली आहे. घटनेत युवकाचे दोन्ही हात तोडण्यात आले (Sarpanch’s Husband Cuts off Man’s Hands) आहेत.

  • Published by:  Kiran Pharate

भोपाळ 18 जुलै: एक अत्यंत संतापजनक घटना नुकतीच समोर आली आहे. सरपंच पतीची कॉलर पकडल्याची शिक्षा एका युवकाला अत्यंत क्रूरपणे दिली गेली आहे. घटनेत युवकाचे दोन्ही हात तोडण्यात आले (Sarpanch’s Husband Cuts off Man’s Hands) आहेत. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) घडली आहे. मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील चोराहेट गावातील हा प्रकार आहे.

चार वर्षाची चिमुरडी झाली पोरकी; नवऱ्यानंच घेतला बायकोचा जीव, भलतंच कारण आलं समोर

घटनेत चोराहेट गावातील एका युवकाचा सरपंच पतीसोबत वाद झाला. हा वाद अधिक वाढला. युवकानं त्‍याला जाब विचारत त्‍याच्‍या शर्टची कॉलर पकडली. याचा गोष्टी राग मनात धरत युवकाला भयंकर शिक्षा देण्यात आली. सुरुवातील संबंधित युवकाला भाजी मंडईत बोलावण्यात आलं. इथे आल्यानंतर सरपंच पतीच्या समर्थकांनी त्याला बेदम मारहाण केली. यानंतर निर्घृणपणे धारदार शस्त्रानं त्याचे दोन्ही हात तोडण्यात आले. सरपंच पती आणि त्याच्या समर्थकांनी या युवकाचे दोन्ही हात तोडले.

फेक नावानं ऑनलाईन क्लासमध्ये प्रवेश; कॅमेरा सुरू करत काढले सर्व कपडे अन्..

गंभीर जखमी युवकाला होशंगाबाद रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथकही तैनात करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक आणि सरपंच पती यांच्यात जुनाच वाद होता. मात्र, युवकानं कॉलर पकडल्यानं हा वाद आणखीच चिघळला. सरपंच पती हा आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी पीडित युवकाच्या कुटुंबीयांनी केली आहे.

First published:

Tags: Crime news, Madhya pradesh