मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चार वर्षाची चिमुरडी झाली पोरकी; नवऱ्यानंच घेतला बायकोचा जीव, भलतंच कारण आलं समोर

चार वर्षाची चिमुरडी झाली पोरकी; नवऱ्यानंच घेतला बायकोचा जीव, भलतंच कारण आलं समोर

चंद्रपुरातील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे.

चंद्रपुरातील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे.

Murder in Bhandara: खाजगी दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून काम करणाऱ्या 24 वर्षीय विवाहित महिलेचा गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk

भंडारा, 18 जुलै: खाजगी दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून काम करणाऱ्या 24 वर्षीय विवाहित महिलेचा गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही हत्या तिच्या पतीनंच केल्याची बाब उघडकीस आली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून आरोपी पती आपल्या बायकोवर चारित्र्यावरून संशय घेत होता. त्यामुळे तिला नोकरीही सोडावी लागली होती. नोकरी सोडल्यानंतर प्रियकर आपल्या बायकोला घरी येऊन भेटत असावा, या संशयातून पतीनं पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित घटना भंडारा जिल्ह्यातील राजेहदेगाव येथील आहे. तर स्नेहलता लंकेश्वर खांडेकर असं हत्या झालेल्या 24 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. ती आपल्या पतीसोबत सुयोग नगर याठिकाणी वास्तव्याला होती. तर लंकेश्वर खेमराज खांडेकर असं 34 वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. आरोपी पती हा कंत्राटी कामगार आहे, तर मृत पत्नी एका खाजगी रुग्णालयात कंपाऊंडर म्हणून काम करत होत्या. अवघ्या पाच वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं होतं. दोघांना चार वर्षांची एक मुलगी देखील आहे.

हेही वाचा-नात्याला काळिमा! शाळकरी मुलीवर चुलत भावांकडून बलात्कार; बीडमधील संतापजनक घटना

पण आरोपी पती तिच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता म्हणून तिने नोकरीही सोडली होती. कालांतरानं मृत स्नेहलता यांनी गोंदिया जिल्ह्यातील कोरोना सेंटरमध्ये कंपाऊंडर म्हणून काम करू लागल्या. पण राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात येऊ लागल्यानं स्नेहलता यांची नोकरीही गेली. त्यामुळे त्या सुयोग नगर, राजेहदेगाव याठिकाणी राहणाऱ्या आपल्या पतीकडे पुन्हा आल्या. आरोपी पती हा कंत्राटी कामगार असल्यानं दिवसभर घराबाहेर असतो.

हेही वाचा-उस्मानाबादचा दरोडेखोर नाशकात जाऊन बनला गजरा विक्रेता; कळंबमधील हत्येचा आरोपी अटक

दरम्यान स्नेहलताचा प्रियकर तिला भेटायला येत असावा असा संशय आरोपी पतीच्या मनात यायचा. यातूनच आरोपी पतीनं स्नेहलताचा गळा आवळून खून केला आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Bhandara Gondiya, Crime news, Murder, Wife