Home /News /crime /

सिद्धू मुसेवालाला खरंच संतोष जाधवने मारली गोळी? 5 दिवसांच्या चौकशीत नवा खुलासा, प्रकरणाला वेगळंच वळण

सिद्धू मुसेवालाला खरंच संतोष जाधवने मारली गोळी? 5 दिवसांच्या चौकशीत नवा खुलासा, प्रकरणाला वेगळंच वळण

पुणे क्राईम बँचने दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधवला अटक करण्यात आल्यानंतर चौकशीदरम्यान सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडात सामील नसल्याचं त्याने सांगितलं आहे.

    नवी दिल्ली 18 जून : काँग्रेस नेता आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर (Sidhu Moosewala Murder) पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत प्रकरणातील संशयित शूटर्सला ताब्यात घेतलं. यात पुण्यातील संतोष जाधवलाही अटक करण्यात आली. मात्र, आता चौकशीत त्याने वेगळेच खुलासे केले आहेत. पाच दिवस तपास यंत्रणांनी संतोष जाधवची चौकशी केली आहे. सिद्धू मुसेवाला हत्याकांडात तो खरंच सहभागी होता का? खरंच सिद्धू मुसेवालाला संतोष जाधवने (Santosh Jadhav) गोळी मारली होती का? मुसेवाला यांच्या हत्येसाठी बिश्नोई गँगने खरंच जाधवला हायर केलं होतं का? यात त्याचा हात नसेल तर संतोष जाधव गुजरातमध्ये लपून का बसलेला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पुणे क्राईम ब्रँचची टीम गुजरात आणि मध्यप्रदेशातून माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुणे क्राईम बँचने दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधवला अटक करण्यात आल्यानंतर चौकशीदरम्यान सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडात सामील नसल्याचं त्याने सांगितलं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या वेळी तो पंजाबमध्ये नव्हताच. सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात पुणे कनेक्शन, दोन शूटर्स पुण्यातले; कोण आहे आरोपी संजय जाधव? पुणे क्राईम बँचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधवने म्हटलं की 29 मे रोजी जेव्हा सिद्धू मुसेवालाची हत्या झाली, तेव्हा तो गुजरातमध्ये मुद्रापोर्टजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये थांबलेला होता. हत्येच्या तीन दिवस आधीपासून 29 मेपर्य़ंत हत्येनंतरही जवळपास 7 दिवस तो याच हॉटेलमध्ये थांबला होता. संतोष जाधवच्या म्हणण्यानुसार, पंजाब पोलिसांनी त्याचे फोटो सार्वजनिक ठिकाणी लावल्याने तो घाबरला होता. त्याला आपण पकडलं जाऊ अशी भीती असल्याने त्याने आपल्या डोक्याचे पूर्ण केस काढले. दाढी, मिशा काढून आणि आपला संपूर्ण पेहराव बदलून तो हॉटेलमधून बाहेर पडला. Punjabi Singer Moose Wala Murder: सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचं पाकिस्तान कनेक्शन, ISI नं रचला होता हत्येचा कट? संतोष जाधवच्या म्हणण्यानुसार एकंदरीत वातावरण पाहून त्याने नेपाळला पळून जाण्याची योजना आखली. मात्र त्याला भीती होती की त्याचे फोटो सगळीकडे लावले गेले आहेत, अशात काहीही हालचाल केल्यास तो पकडला जावू शकतो. यामुळे त्याने आपला मित्र नवनाथ सूर्यवंशीसोबत संपर्क साधला आणि काही दिवस त्याची लपण्याची व्यवस्था करण्यास सांगितलं. नवनाथने भूज येथील एका घरात त्याची लपण्याची पूर्ण व्यवस्था केली. नवनाथने त्याला आपला हँडसेटही दिला, जेणेकरून त्याला लवकरात लवकर इथून बाहेर पडता येईल. संतोषच्या म्हणण्यानुसार त्याच्यासाठी जेवणाची सोय आणि इतर सर्व गरजेच्या वस्तूंची व्यवस्था नवनाथच करत होता. मात्र त्याला कळत नव्हतं की कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही. अशात पुणे क्राईम ब्राँचच्या टीमने याठिकाणी छापा टाकत त्याला अटक केली. पोलीस सध्या त्या हॉटेलमध्ये चौकशीसाठी गेले आहेत, जिथे आपण थांबलो होतो, असा दावा संतोषने केला आहे. इथून पोलीस सीसीटीव्ही फुटेजही कलेक्ट करतील. तर बिश्नोई गँगची अधिक माहिती तसंच गँगसोबत जोडले गेलेले शूटर आणि हत्यारांचा पुरवठा याची माहिती घेण्यासाठी एक टीम मध्यप्रदेशला गेली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Murder, Punjab, Singer

    पुढील बातम्या