Home /News /maharashtra /

सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात पुणे कनेक्शन, दोन शूटर्स पुण्यातले; कोण आहे आरोपी संजय जाधव?

सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात पुणे कनेक्शन, दोन शूटर्स पुण्यातले; कोण आहे आरोपी संजय जाधव?

Sidhu Musewala Wala Murder Case: पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण कनेक्शन समोर आले.

Sidhu Musewala Wala Murder Case: पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण कनेक्शन समोर आले.

Sidhu Musewala Wala Murder Case: पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण कनेक्शन समोर आले.

पुणे, 06 जून: पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण कनेक्शन समोर आले. गायकाच्या हत्येची कबुली लॉरेन्स बिश्नोईने दिली होती. आता या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शनही समोर आलं आहे (Maharashtra Connection with Moosewala's Murder). 8 आरोपींमध्ये पुण्याच्या सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव यांची नावे आहेत. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ बाणखेले खून प्रकरणातील मोक्काचे फरार आरोपी आहेत. दोन वर्षापासून खून केल्यानंतर संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ फरार आहेत. हे दोघंही पंजाबमध्ये राहत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. हे दोघे ही लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीमधले असल्याचे समोर आलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना सीसीटीव्ही पाहून संतोष जाधवची माहिती सांगितली होती. संतोष जाधव हाच आरोपी असू शकतो, त्यावरून आज पंजाब पोलिसांनी ग्रामीण पोलिसांना विचारणा केली. गायक सिद्धू मुसेवाला याच्यावर हल्ला करण्याकरता सचिन बिश्नोई गॅंगने महाराष्ट्र राज्यातून दोन शार्प शूटर बोलावले होते. संतोष जाधव आणि महाकाल नावाचे हे दोन शूटर होते. ज्यांनी मुसेवालावर गोळीबार केलाय यांची नावे पंजाब पोलिसांनी जाहीर केली आहेत. मुहूर्त ठरला..! 'या' महिन्यात होणार रखडलेल्या 14 महापालिकांच्या निवडणुका? मुसेवालांची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शूटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते. 2 महाराष्ट्रातले, 2 हरियाणातले आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता. कोण आहे संतोष जाधव पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना CCTV फूटेज पाहून संतोष जाधवबद्दलची माहिती दिली होती. संतोष जाधव हा मंचरचा सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ रानिया बाणखेले याच्या खून प्रकरणात संतोष जाधव फरार असून पुणे ग्रामीण पोलीस संतोष जाधवच्या शोधात आहे. 'सूर्य उगवताच मी तुला संपवून टाकेन', असे स्टेटस संतोष जाधव यांनी सोशल मीडियावर टाकले होते. त्याला प्रत्युत्तर देताना ओंकारने संतोष जाधव यांना भेटून मारहाण करणार असल्याचे लिहिले. कोणीही येऊ द्या ...त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी दुचाकीवरून आलेल्या शूटरने ओंकार उर्फ रानिया बाणखेले यांची भरदिवसा गोळीबार करून हत्या केली. नेमकं काय घडलं होतं? पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला (punjabi singer sidhu moosewala ) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. मानसा येथे सिद्धू यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत सिद्धुचा दुर्दैवी मृत्यू झाला. पंजाबमधील भगवंत मान सरकारने ४२४ महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय नुकताच घेतला. सुरक्षा काढून घेतलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये सिद्धू मुसेवाला यांचाही सामावेश होता. सुरक्षा काढून घेतल्याचा ठीक एका दिवसानंतर ही घटना घडली होती. मुसेवाला यांच्या एकूण 23 जखमा होत्या असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं होतं. 14 ते 15 गोळ्या मुसेवालांच्या शरीरातून आरपार गेल्या होत्या. या हल्ल्यात मुसेवालाच्या शरीरवर तब्बल तीन ते पाच सेंटीमीटर पर्यंतच्या खोल जखमा दिसून आल्या होत्या. सध्या पंजाब पोलीस हा हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Pune (City/Town/Village)

पुढील बातम्या