मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Sameer Wankhede: समीर वानखेडे यांना मोठा झटका, नवी मुंबईतील 'त्या' बारचा परवाना रद्द

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांना मोठा झटका, नवी मुंबईतील 'त्या' बारचा परवाना रद्द

एसीबी मुंबई झोनलचे माजी संचालक समीर वानखेडे यांना एक मोठा झटका बसला आहे. नवी मुंबईत त्यांच्या नावावर असलेल्या बारचे लायसन्स रद्द करण्यात आला आहे. (Big jolt for Sameer Wankhede)

एसीबी मुंबई झोनलचे माजी संचालक समीर वानखेडे यांना एक मोठा झटका बसला आहे. नवी मुंबईत त्यांच्या नावावर असलेल्या बारचे लायसन्स रद्द करण्यात आला आहे. (Big jolt for Sameer Wankhede)

एसीबी मुंबई झोनलचे माजी संचालक समीर वानखेडे यांना एक मोठा झटका बसला आहे. नवी मुंबईत त्यांच्या नावावर असलेल्या बारचे लायसन्स रद्द करण्यात आला आहे. (Big jolt for Sameer Wankhede)

ठाणे, 2 फेब्रुवारी : मुंबईतील क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर एनसीबी मुंबईचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) चांगलेच चर्चेत आले. त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे समीर वानखेडे अडचणीत सापडले आहेत. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून समीर वानखेडेंवर अनेक आरोप करण्यात आले असतानाच आता समीर वानखेडेंना एक मोठा झटका बसला आहे.

समीर वानखेडे यांच्या नावावर असलेल्या नवी मुंबईतील बारचे लायसन्स रद्द (Sameer Wankhede Navi Mumbai Sadguru restro bar license cancels Thane Collector) करण्यात आले आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांच्या बारचे लायसन्स रद्द केले आहेत. या संदर्भात आज दुपारपर्यंत लेखी प्रत मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बारचे लायसन्स रद्द केल्याने समीर वानखेडे यांच्यासाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

समीर वानखेडे हे अल्पवयीन असताना त्यांना बारचा परवाना देण्यात आला होता असा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बाजवली होती. बारचा परवाना मिळवण्यासाठी किमान वय 21 वर्षे आवश्यक आहे मात्र, असे असतानाही समीर वानखेडे यांना अल्पवयीन असताना बारचा परवाना मिळाला होता.

वाचा : 50 लाखांसाठी फॉर्च्यूनर गाडीसह व्यापाऱ्याचं अपहरण; 10 तास रंगलं थरारनाट्य अन्...

नवी मुंबईत असलेला सदगुरू रेस्ट्रो बारचा परवाना हा समीर वानखेडे यांच्या नावावर आहे. समीर वानखेडे यांच्या नावावर हा बारचा परवाना झाला त्यावेळी त्यांचे वय अवघे 17 वर्षे होते. अल्पवयीन असतानाही पारचा परवाना कशा मिळाला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाने समीर वनाखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर आता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा बार परवाना रद्द केला आहे.

वानखेडेंना कारणे दाखवा नोटीस

27 ऑक्टोबर 1997 रोजी समीर वानखेडेंच्या नावे बारचा परवाना काढण्यात आला होता. बारच्या परवान्यासाठी किमान 21 वयाची अट आहे. मात्र, असे असतानाही त्यांना बारचा परवाना मिळाला. समीर वानखेडे यांचे वडील त्यावेळी उत्पादन शुल्क विभागाक कार्यरत होते. याप्रकरणी आता समीर वनाखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

मलिकांनी केला होता आरोप

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी वानखेडे आणि त्यांच्या वडिलांवर आणखी एक नवा आरोप केला होता. वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात (Excise Department) कार्यरत असताना त्यांनी आपल्या अल्पवयीन (Minor) मुलाच्या नावाने दारुच्या दुकानाचा परवाना (Liquor shop License) दिला. संबंधित बारचा परवाना हा 1997 साली जारी करण्यात आला होता. त्यावेळी समीर यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालं नव्हतं, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता.

First published:
top videos

    Tags: Crime, NCB, Thane