Home /News /mumbai /

'समीर वानखेडे अल्पवयीन असताना त्यांना दारुच्या दुकानाचा परवाना' मलिकांचा खळबळजनक आरोप

'समीर वानखेडे अल्पवयीन असताना त्यांना दारुच्या दुकानाचा परवाना' मलिकांचा खळबळजनक आरोप

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात (Excise Department) कार्यरत असताना त्यांनी आपल्या अल्पवयीन (Minor) मुलाच्या नावाने दारुच्या दुकानाचा परवाना (Liquor shop License) दिला, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 19 नोव्हेंबर : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (NCB Sameer Wankhede) यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी वानखेडे आणि त्यांच्या वडिलांवर आणखी एक नवा आरोप केला आहे. वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात (Excise Department) कार्यरत असताना त्यांनी आपल्या अल्पवयीन (Minor) मुलाच्या नावाने दारुच्या दुकानाचा परवाना (Liquor shop License) दिला. संबंधित बारचा परवाना हा 1997 साली जारी करण्यात आला होता. त्यावेळी समीर यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालं नव्हतं, असा दावा नवाब मलिक यांनी केला. तसेच वानखेडे यांनी आपल्या संपत्तीविषयीची खरी माहिती केंद्र सरकारला दिली नाही, असाही आरोप मलिक यांनी केला.

  नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?

  "समीर वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात कार्यरत होते आणि फर्जीवाड्यात ते माहीर होते. मी एक कागद शेअर केला आहे. तो कागद मला उत्पादन शुल्क विभागातने दिला आहे. त्या कागदात तुम्ही बघाल तर 1997 आणि 1998 सालाचं जो ठाणे जिल्ह्याचं रजिस्ट्रेशन आहे, त्यामध्ये लायसन्स नंबर 875 असं असून सद्गुरु हॉटेल नावाने दारुच्या दुकानाचा परवाना जारी करण्यात आला होता. जो परमीट देण्यात आला होता तो समीर ज्ञानदेव वानखेडे नावाने देण्यात आला होता. ते परमीट 1997 पासून समीर वानखेडेंच्या नावाने रिन्यू झालं होतं. शेवटचं रिनेवल हे 2022 पर्यंतसाठी करण्यात आलं आहे. त्यासाठी 3 लाखापेक्षा जास्त पैसे भरण्यात आले आहेत", असा दावा नवाब मलिक यांनी केला. हेही वाचा : आंदोलन मागे घेण्यासाठी राकेश टिकैत यांनी ठेवली 'ही' अट "विशेष म्हणजे ज्यावेळी पहिला परवाना देण्यात आला त्यावेळी समीर वानखेडे यांचं वय 17 वर्षे 10 महिने 19 दिवस होतं. वडील डिपार्टमेंटमध्ये काम करतात म्हणून मुलगा अल्पवयीन असताना त्याच्या नावाने परवाना जारी करण्यात आला हा सर्वात मोठा फर्जीवाडा आहे. वयवर्षे 18 पेक्षा कमी असलेल्यांना लायसन्स दिलं जाऊ शकत नाही. अल्पवयीन मुलाला परवाना देण्यात आला आणि त्याच्या नावानेच आजही सद्गुरु बार आणि रेस्टॉरंट वाशीमध्ये सुरु आहे. 19997 सालापासून आजपर्यंत जवळपास 24 वर्ष होत आले आहेत, एकाही वर्षी लायसन्स सस्पेंड होण्यासारखा प्रकार घडला नाही. त्यांनी फर्जीवाडा करुन ते रेस्टॉरंट सुरु केलं आणि आजही ते समीर ज्ञानदेव वानखेडे तसेच समीर दाऊद वानखेडे नावाने चालत आहे", असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

  'समीर वानखेडे यांनी संपत्तीची माहिती लपवली'

  "समीर वानखेडे यांनी 2017 मध्ये आपल्या संपत्तीची माहिती जाहीर केली होती. त्यामध्ये सद्गुरु हॉटेलची 1995 सालाची किंमत 1 कोटी होती, असं म्हटलं आहे. तसेच ती संपत्ती त्यांच्या आई आणि वडिलांच्या नावावर आहे. त्यांच्या आईकडून त्यांना ही संपत्ती मिळाली आहे. तसेच 2 लाख 40 हजार रुपये वार्षिक भाडे येत आहे, असं त्यात म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी 2020 साली देखील DOPT आणि त्यांच्याशी संबंधित डिपार्टमेंटला माहिती दिली होती. केंद्र सरकारमध्ये कामासाठी रुजू होणऱ्या आयएएस, आयपीएस इत्यादी अधिकाऱ्यांना त्यांच्या संपत्तीची माहिती सरकारला द्यावी लागते. मग वानखेडे यांनी ही बाब कशाला लपावली? नोकरी घेतल्यानंतर 2017 पर्यंत त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती लपवली", असं नवाब मलिक म्हणाले.

  डिओपीटीकडे तक्रार करणार, मलिकांचा इशारा

  "समीर वानखेडे यांनी 2017 साली जी माहिती दिली ती देखील खोटी माहिती दिली कि, त्या संपत्तीतून त्यांना भाडे येतंय. पण खरंतर ते तिथून शराबखाना चालवण्याचं काम करत आहेत. सर्व्हिस कंडक्ट नियमानुसार केंद्र सरकारमधील कोणताही अधिकारी नोकरी करताना व्यवसाय करु शकत नाही. ज्याप्रकारे साऱ्या गोष्टी झाल्यात त्या हिशोबाने त्यांनी गोष्टी लपवल्याचा स्पष्ट होतो. त्यांना नोकरीत राहण्याचा अधिकार नाही. आम्ही तीन-चार दिवसांनी डिओपीटीकडे याबाबत तक्रार करु", असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.
  Published by:Chetan Patil
  First published:

  Tags: Nawab malik

  पुढील बातम्या