Home /News /mumbai /

मुंबई: 50 लाखांसाठी फॉर्च्यूनर गाडीसह व्यापाऱ्याचं अपहरण; 10 तास रंगलं थरारनाट्य अन्...

मुंबई: 50 लाखांसाठी फॉर्च्यूनर गाडीसह व्यापाऱ्याचं अपहरण; 10 तास रंगलं थरारनाट्य अन्...

Crime in Mumbai: 26 जानेवारी रोजी मुंबईत एका ड्रायफ्रुट व्यापाऱ्याला आणि त्यांच्या ड्रायव्हरला फॉर्च्यूनर गाडीसह अपहरण (dry fruit merchant and driver kidnapping case) केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

    मुंबई, 02 फेब्रुवारी: 26 जानेवारी रोजी मुंबईत एका ड्रायफ्रुट व्यापाऱ्याला आणि त्यांच्या ड्रायव्हरला फॉर्च्यूनर गाडीसह अपहरण (dry fruit merchant and driver kidnapping case) केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अपहरणकर्त्यांनी जीवे मारण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागितली (Demand 50 lakh) होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच, मुंबईतील समता नगर पोलिसांनी अवघ्या 10 तासांतच बोरिवली परिसरातून तिन्ही आरोपींना अटक (3 accused arrested) केली आहे. ड्रायफ्रुट व्यापाऱ्यासह चालक सुखरूप बचावला आहे. पोलिसांनी फॉर्च्यूनर गाडीही ताब्यात घेतली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी अपहरण झालेले ड्रायफ्रुट व्यापारी धवल रमेश अकबारी (33) आपल्या चालकासह फॉर्च्यूनर गाडीतून बांद्रा खेरवाडी परिसरातून जात होते. दरम्यान तीन आरोपींनी जबरदस्तीने त्यांचा रस्ता अडवला आणि कारमध्ये शिरले. आरोपींनी ड्रायफ्रुट व्यापाऱ्यासह त्यांच्या चालकाचं अपहरण केलं. अपहरणकर्त्यांनी दोघांना जीवे मारण्याची धमकी देत हायवे रस्त्यावरून त्यांना कांदीवली परिसरातील ठाकूर विलेज याठिकाणी घेऊन गेले. याठिकाणी गेल्यानंतर आरोपींनी व्यापाऱ्याकडे 50 लाखांची खंडणी मागितली. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारू अशी धमकी दिली. पण एवढी मोठी रक्कम एकाच वेळी देणं शक्य नसल्याचं व्यापाऱ्यानं सांगितल्यानंतर, खंडणीची रक्कम 5 लाख रुपये ठरवण्यात आली. यानंतर अपहरणकर्त्यांनी पैशांचा बंदोबस्त करण्यासाठी व्यापाऱ्याची सुटका केली. पण कारचालक आणि फॉर्च्यूनर गाडी आपल्याच ताब्यात ठेवली. आरोपींच्या तावडीतून सुटका होताच, व्यापाऱ्याने थेट समतानगर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी बोरिवली परिसरातून तिन्ही अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हेही वाचा-माजी IPS अधिकाऱ्याच्या घरात पैशांचं घबाड, कोट्यवधींची रोख रक्कम जप्त दरम्यान, आरोपी चालकाच्या मोबाइलवरून व्यापाऱ्याला फोन करून सतत धमकी देत होते. तसेच पैसे न मिळाल्यास चालकाला जीवे मारू अशी धमकी देखील आरोपींनी दिली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल लोकेशनच्या आधारावर आरोपींचा पत्ता शोधला. पण आरोपी सतत आपली लपण्याची जागा बदलत होते. सर्वप्रथम आरोपींनी व्यापाऱ्याला पैसे घेऊन शताब्दी रुग्णालय परिसरात बोलावलं होतं. पण त्यांच्यासोबत पोलीस असल्याचा सुगावा अपहरणकर्त्यांना लागल्यानंतर, त्यांनी पोलिसांनी सोबत घेऊन आला तर चालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. हेही वाचा-Pune: 300 कोटींच्या बिटकॉईनसाठी पोलीस कर्मचाऱ्यानेच केलं व्यापाऱ्याचं अपहरण बरेच तास अपहरणाचं हे थरारनाट्य सुरू असताना, पोलिसांनी बोरीवली परिसरातील राजेंद्र नगर येथून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच फॉर्च्यूनर कार आणि चालकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. कृष्णा बालप्पा सैदापुर उर्फ  पम्पया (23), समीर मोहम्मद मौलाना शेख (24) आणि देवराज गणेश पवार उर्फ बाबू (25) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. समतानगर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kidnapping, Mumbai

    पुढील बातम्या