पुणे, 10 जानेवारी : पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसत आहेत. त्यातच आता पुण्यातील दौंड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यात एक जण दोन गावठी पिस्तूल विकण्यासाठी आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गावठी पिस्तूल विकायला आलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दौंड तालुक्यातील राहू येथून त्याला अटक करण्यात आली. तुषार तात्या काळे (रा.वाळकी,ता.दौंड)असे आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार काळे हा राहू येथे गावठी पिस्तूलची विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. सोमवार 9 जानवारीला तुषार काळे हा सायंकाळच्या सुमारास एका हॉटेलच्या ठिकाणी आला होता. याचवेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 गावठी पिस्तूल मिळून आले. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. हेही वाचा - पत्ता विचारल्याने ऑडी चालकाला आला राग; थेट वकिलालाच.. पुण्यातील धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, अजय घुले, विजय कांचन, गुरू जाधव, धिरज जाधव, अक्षय सुपे यांचे पथकाने ही कारवाई केली. याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशन करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.