जयपूर, 6 ऑगस्ट : राजस्थानमध्ये 20 दिवसांच्या आत आणखी एका संताने सुसाइड केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या प्रकरणात भाजप आमदारावर आरोप केला जात आहे.
भाजप आमदारावर आश्रमाचा रस्ता बंद केल्याचा आरोप करीत संताने आपल्याच आश्रमातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात सूचना मिळाल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी मृतदेह झाडावरुन खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिकांनी याला विरोध केला.
आश्रमातील साधु आणि गावकऱ्यांनी मागणी केली आहे की, संताची सुसाइड नोट सार्वजनिक केली जावी. यादरम्यान तब्बल 28 तास संताचा मृतदेह झाडाला लटकून होत. शेवटी स्थानिकांची अट मान्य करुन पोलिसांनी मृतदेह खाली उतरवला. या घटनेनंतर समाधीच्या जागेवरुन वाद सुरू झाला होता. साधुचे समर्थक हे आमदाराच्या जमिनीवर त्यांची समाधी तयार करू इच्छित होते. यावर पोलिसांनी निर्बंध आणले. यामुळे नाराज स्थानिकांनी दगडफेक सुरू केली. यादरम्यान 20 हून अधिक लोक जखमी झाले. तर एक पोलीसही जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अद्यापही संताला समाधी देण्यात आलेली नाही.
ही घटना जालोर जिल्ह्यातील राजपुरा गावातील आहे. येथे हनुमान आश्रमात साधु रविनाथ महाराज (60) यांनी गुरुवारी रात्री आश्रममध्ये सुसाइड केली होती. हा मृतदेह शनिवारी सकाळी 10.30 वाजता उतरवण्यात आला. यापूर्वी शुक्रवारी रात्री 8 वाजता भाजप आमदार पूराराम चौधरीसह तीन जणांविरोधात जातीसूचक शब्द म्हणणं आणि धमकी दिल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण? आश्रम आणि सुंधा माता रस्त्यामध्ये भीनमाल आमदार पूराराम चौधरी याची 20 बिघे जमीन आहे. या जागेवर चौधरी यांनी रेसॉर्ट बनवण्याचा प्लान आहे. ही जमीन कोट्यवधींची असल्याचं सांगितलं जात आहे. जर रिसॉर्ट उभारलं तर रस्त्याहून आश्रमच्या दिशेने जाणारा रस्ता बंद होईल. गेल्या अनेक दिवसांपासून या जमिनीवर वाद सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार, रस्ता बंद होणार याशिवाय आमदाराच्या दादागिरीमुळे त्रस्त संताने सुसाइड केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Crime news, Rajasthan