Home /News /crime /

उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचं इंटरनॅशनल कनेक्शन; सूत्रधार मौलवीबाबत मोठा खुलासा

उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचं इंटरनॅशनल कनेक्शन; सूत्रधार मौलवीबाबत मोठा खुलासा

या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. अब्दुल अरबाज आणि मौलवी मुफिक अहमद अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत.

  अमरावती, 5 ऑगस्ट : उदयपूरमधील टेलर कन्हैयालालची हत्या होण्याच्या बरोबर एक आठवडापूर्वी अमरावतीमधील (Amravati Crime News) उमेश कोल्हे या 54 वर्षांच्या केमिस्टची हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांनी भाजपामधील निलंबित नेत्या नुपूर शर्मा(Nupur Sharma) यांच्या बाजूनं पोस्ट लिहिली होती. याच कारणांमुळे कोल्हे यांची हत्या झाल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. अब्दुल अरबाज आणि मौलवी मुफिक अहमद अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मौलवी अहमद यांनीच कोल्हे यांच्या हत्येचा प्लान आखला होता. त्यांना यासाठी कतार आणि कुवैतमधून निधी पुरवला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक केलेले दोन्ही आरोपी इरफान शेख, शोएब खान, मुदस्सिर अहमद, आतिफ राशिद, यूसुफ खान, अब्दुल तौफीक आणि शाहरुख पठा,न वांछित आरोपी शमीम अहमद, फिरोज अहमद यांच्यासोबत काम करीत होते. आतापर्यंत या प्रकरणात 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 21 जून रोजी कोल्हे (54) यांची हत्या करण्यात आली होती. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ फेसबुकवर पोस्ट लिहिण्याविरोधात त्यांची हत्या करण्यात आली. NIA ने आपल्या प्राथमिक तपासात दिलेल्या माहितीनुसार, लोकांच्या एका समुहाने शर्मा यांना समर्थन करणाऱ्यांना मेसेज पाठवण्याचं कारस्थान रचलं होतं. त्यांनी धर्मांच्या आधारावर शत्रूत्व वाढवण्यासाठी भारतात एका समुहात दहशत निर्माण करण्याचा कट रचला होता. समाजातील एका समुहात दहशत निर्माण करण्यासाठी ही हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
  काय आहे प्रकरण? कोल्हे 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 दरम्यान त्यांचे 'मेडिकल स्टोर' बंद करून घरी जात असताना हा प्रकार घडला. त्यावेळी संकेत त्याची पत्नी वैष्णवीसोबत दुसऱ्या बाईकवर होता. संकेतनं दिलेल्या तक्रारीनुसार 'मोटारसायकलीवरून आलेल्या दोन जणांनी अचानक माझ्या वडिलांची बाईक अडवली आणि त्यांनी वडिलांची गळ्यावर चाकूनं हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या गळ्यातून बरंच रक्त वाहात होते. मी माझी गाडी थांबवली आणि मदतीसाठी लोकांना ओरडून विनंती केली. त्यावेळी अन्य एक जण आला आणि त्यासोबत दोन्ही मारेकरी मोटारसायकलीवरून फरार झाले. मी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीनं वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अमरावती शहर पोलिसांमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार 'अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार त्या सर्वांना आणखी एका आरोपीनं मदत केली होती. त्यानं या आरोपींना पळून जाण्यासाठी एक कार आणि 10,000 रूपये दिले होते.'
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Gang murder

  पुढील बातम्या