हा व्हिडिओ गोंदिया तालुक्यातील तुमखेड़ा येथील आहेत. घटनेत नागपुरे कुटुंबात शेत जमिनीवरुन वाद झाला. या वादाचे रूपांतर काहीच वेळात हाणामारीत झालं आणि एकमेकांवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर या घटनेत एक जण गंभीर जखमी असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर प्रेम, नंतर धोका, अल्पवयीन मुलीची तीनवेळा विक्री; कशी फुटली अत्याचाराला वाचा हा वाद सुरू असताना शेजारीच उभा असलेल्या व्यक्तीने संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की दोन गटांमध्ये वाद सुरू आहे. यात काही महिला आणि पुरुष आपसात भांडत आहेत. मात्र, इतक्यात यातील एक व्यक्ती दुसऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करतो. यानंतर हा वाद जास्तच चिघळतो. घटनेचा व्हिडिओ विचलित करणारा आहे.जमिनीच्या वादातून भावकीत मारामारी; कुऱ्हाडीने एकमेकांवर हल्ला, गोंदियातील धक्कादायक घटनेचा Video pic.twitter.com/qtvFDLLxz6
— News18Lokmat (@News18lokmat) August 4, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Shocking video viral