जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / VIDEO : हॉस्टेलमधील 60 तरुणींचे अंघोळ करतानाचे MMS व्हायरल, 8 जणींनी केला आत्महत्येचा प्रयत्न; विद्यापीठात मोठा गोंधळ

VIDEO : हॉस्टेलमधील 60 तरुणींचे अंघोळ करतानाचे MMS व्हायरल, 8 जणींनी केला आत्महत्येचा प्रयत्न; विद्यापीठात मोठा गोंधळ

VIDEO : हॉस्टेलमधील 60 तरुणींचे अंघोळ करतानाचे MMS व्हायरल, 8 जणींनी केला आत्महत्येचा प्रयत्न; विद्यापीठात मोठा गोंधळ

मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलीने 60 मुलींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून तरुणांना पाठवल्याने मोठा गोंधळ उडाला. हे व्हिडिओ तरुणांनी सोशल मीडियावर व्हायरल केले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

चंदीगड 18 सप्टेंबर : चंदीगड विद्यापीठात गोंधळ रात्री अडीच वाजताच्या सुमारास मोठा गोंधळ उडाला. मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलीने 60 मुलींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून तरुणांना पाठवल्याने मोठा गोंधळ उडाला. हे व्हिडिओ तरुणांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. मिळालेल्या माहितीनुसार, बऱ्याच दिवसांपासून हॉस्टेलमधील तरुणींचे व्हिडिओ बनवले जात होते. ही बाब समोर येताच काही तरुणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. धक्कादायक! घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न; विरोध केल्याने गाठला क्रूरतेचा कळस, तरुणीचा मृत्यू महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, 8 मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी चंदीगड विद्यापीठाला घेराव घातला आणि ‘वी फॉर जस्टिस’ असा नारा दिला. व्हिडिओ बनवणाऱ्या मुलीवर हल्ला होऊ नये म्हणून तिला हॉस्टेलच्या एका खोलीत बंद करून ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

जाहिरात

हा गोंधळ एवढा वाढला की घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि सुरक्षा रक्षकाने मुख्य गेट बंद केलं. संतप्त विद्यार्थ्यांनी पीसीआर वाहनांवर हल्ला करण्यास सुरुवात केला, यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. प्रकरण वाढत असल्याने पोलीस प्रशासनानेही काही बोलत टाळलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर मुलींचा व्हिडिओ व्हायरल करणारा तरुण हा शिमला येथील रहिवासी आहे. हॉस्टेलमधील एक मुलगी त्याला मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ काढून पाठवायची. ती तरफडत राहिली, किंचाळली, आठ नराधमांनी पिस्तूल रोखत लचके तोडले, व्हिडीओ बनवला आणि….. या युवकाने हे व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केले. यानंतर आपले असे व्हिडिओ इंटरनेटवर पाहून हॉस्टेलमधील तरुणींना धक्का बसला. यानंतर अनेकींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनं एकच गोंधळ उडाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात