लखनऊ 18 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये आणखी एका मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यात दोन तरुणांनी एका तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावर तरुणीने आक्षेप घेतल्यानंतर दोघांनी मिळून तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर जखमी मुलीला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र नंतर तिचा मृत्यू झाला. आरोपी तरुणांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली आहे. मुलीच्या मृत्यूनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी दोषींवर कडक कारवाईचं आश्वासन दिलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. लखीमपूर खीरी जिल्ह्यातील भीरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात ही घटना घडली आहे. 20 वर्षीय पीडितेचा मारहाणीमुळे मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितलं की, 12 सप्टेंबर रोजी दोन दुसऱ्या समुदायातील तरुणांनी केलेल्या हल्ल्यात मुलगी जखमी झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, त्यानंतर तिचा घरीच मृत्यू झाला पुण्यात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या, घरमालकाने दिली धक्कादायक माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रचंड पोलीस बंदोबस्तात मृत तरुणीच्या नातेवाईकांनी शनिवारी संध्याकाळी गावात अंत्यसंस्कार केले. पीडितेच्या कुटुंबीयांनी मुलीसोबत विनयभंग झाल्याची तक्रार केल्यानंतरही लक्ष न दिल्याने पोलीस चौकी प्रभारीला निलंबित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. लखीमपूर खीरी पोलिसांनी सांगितलं की, मुलीच्या मृत्यूनंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. कुटुंबातील सदस्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर एफआयआरमध्ये छेडछाड झाल्याची माहिती मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं. “सोशल मीडियाद्वारे शनिवारी हे लक्षात आलं की कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या तक्रारीत बदल केल्याचा आरोप आहे, त्यानंतर संबंधित पोलीस चौकी प्रभारीला निलंबित करण्यात आलं आहे,” असं पोलिसांनी सांगितलं. अहमदनगर हादरलं! 13 वर्षीय मुलीवर 50 वर्षीय नराधमाचा अत्याचार; आईनेच मुलीला संबंध ठेवण्यास पाडलं भाग आता ASP अरुण कुमार सिंह या प्रकरणाचा तपास करत आहेत. विनयभंगाचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दोन तरुणांनी मुलीवर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप मृत मुलीची आई आणि मोठ्या भावाने शुक्रवारी केला होता. मृतांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारवाईचे आश्वासन दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.