मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

केरळमध्ये भयानक रक्तपात, पत्नीच्या समोरच आरएसएस कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

केरळमध्ये भयानक रक्तपात, पत्नीच्या समोरच आरएसएस कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

मृतक आरएसएस कार्यकर्त्या रंजीत

मृतक आरएसएस कार्यकर्त्या रंजीत

RSS worker Murder in Kerala : घटनेच्या वेळी मृतक कार्यकर्त्याची पत्नी त्याच्यासोबत होती. तिच्या डोळ्यांसमोर हा रक्तपात झाला. यावेळी ती आपल्या पतीला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने आटापीटा करत होती.

  • Published by:  Chetan Patil

त्रिवेंद्रम, 15 नोव्हेंबर : केरळमध्ये राजकीय वैमनस्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याची भर दिवसा त्याच्या पत्नीसमोर हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही आज (15 नोव्हेंबर) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. घटनेच्या वेळी मृतक कार्यकर्त्याची पत्नी त्याच्यासोबत होती. तिच्या डोळ्यांसमोर हा रक्तपात झाला. यावेळी ती आपल्या पतीला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने आटापीटा करत होती. पण कारमधून आलेल्या चार आरोपींनी तिला न जुमानता तिच्या पतीवर धारधार शस्त्रांनी वार केले.

संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. आरोपी मृतकाची हत्या करुन फरार झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी केलेल्या तपासात मृतक व्यक्ती हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली. मृतक 27 वर्षीय व्यक्तीचं नाव संजीत असं असून तो एलापुल्लीचा रहिवासी होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली. या घटनेनंतर भाजपने एसडीपीआय पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. एसडीपीआयच्या समर्थकांनीच संजीवची हत्या केली, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा : औरंगाबाद: एकाच दिवशी तरुण-तरुणीनं संपवलं जीवन; गावच्या उपसरपंचावरच गंभीर आरोप

पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कुणालाही बेड्या ठोकलेल्या नाहीत. तसेच आरोपींची ओळख अजून पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत. पण या हत्येच्या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. भर दिवसा चार जण एका व्यक्तीची रस्त्यावर हत्या कशी करु शकतात? त्यांना पोलिसांचं भय नाही का? असे प्रश्न काही स्थानिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

नेमकी घटना काय घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक संजीत हा आपल्या पत्नीसह बाईकने सकाळी नऊ वाजता नित्य नियमाच्या कामाला निघाला होता. रस्त्याने जात असताना एका कारने त्यांना ओव्हरटेक करत त्यांच्या बाईकसमोर गाडी थांबवली. त्यानंतर कारमध्ये असलेले चारही जण बाहेर आले. त्यांनी संजीतला बाईकवरुन खाली पाडलं. त्यानंतर त्याला अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याची पत्नी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. ती रस्त्याने ये-जा करणाऱ्यांकडे मदतीची याचना करत होती. तसेच ती मारेकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होती. पण एकटी पडल्याने मारेकऱ्यांनी तिच्या पतीला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली.

हेही वाचा : जादूटोणा झाल्याचं सांगत तरुणीला बोलावलं घरी; नराधमाने गुंगीचं औषध पाजलं अन्...

संजीत बेशुद्ध झाल्यानंतर आरोपी कारने फरार झाले. त्यानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांच्या मदतीने संजीतला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर संजीतला मृत घोषित केलं. या घटनेमुळे संजीतची पत्नी पूर्णपणे खचली आहे. दुसरीकडे भाजपचे पल्लकडचे जिल्हाध्यक्ष केएम हरिदास यांनी एसडीपीआयकडून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

हत्येमागचं नेमकं कारण काय?

संबंधित हत्येची घटना ही राजकीय वैमनस्यातून झाल्याचा दावा केला जातोय. पोलिसांनी देखील तसाच अंदाज वर्तवला आहे. पण पोलीस अद्याप अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. संबंधित परिसरात काही दिवसांपूर्वी मोठा राजकीय वाद उफाळला होता. याशिवाय केरळमध्ये एसडीपीआय आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. या संघर्षातून याआधी देखील आरएसएसच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आलीय. हत्येच्या या नव्या घटनेमुळे पुन्हा एकदा केरळमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी संयम आणि संवेदनशीलपणे कारवाई करत आहेत. संबंधित परिसरात पोलिसांचा फौजफाटाही वाढवण्यात आला आहे.

First published: