मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नांदेड हादरलं! जादूटोणा झाल्याचं सांगत तरुणीला बोलावलं घरी; नराधमाने गुंगीचं औषध पाजलं अन्...

नांदेड हादरलं! जादूटोणा झाल्याचं सांगत तरुणीला बोलावलं घरी; नराधमाने गुंगीचं औषध पाजलं अन्...

Rape in Nanded: जादूटोणा झाल्याचं सांगत एका भोंदूबाबाने विवाहितेवर अत्याचार (Bhondubaba Raped Married Woman) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Rape in Nanded: जादूटोणा झाल्याचं सांगत एका भोंदूबाबाने विवाहितेवर अत्याचार (Bhondubaba Raped Married Woman) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Rape in Nanded: जादूटोणा झाल्याचं सांगत एका भोंदूबाबाने विवाहितेवर अत्याचार (Bhondubaba Raped Married Woman) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

    नांदेड, 15 नोव्हेंबर: तुमच्यावर कोणीतरी जादूटोणा केला आहे, त्यामुळे तुमचं सासरच्या मंडळींसोबत पटत नसल्याचं सांगून एका भोंदूबाबाने विवाहितेवर अत्याचार (Bhondubaba Raped Married Woman) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं पीडित महिलेला आपल्या घरी बोलावून तिला पाण्यातून गुंगीचं औषध देत तिच्यावर अत्याचार केला आहे. मुख्य आरोपीच्या मित्राने देखील पीडितेकडे लैंगिक सुखाची मागणी  (Demand sexual relation) केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फिर्याद दाखल होताच पोलिसांनी एका आरोपीला अटक (One Accused arrested) केली आहे. न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शेख याहिया असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर मुख्य आरोपी अजीज बाबा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय पीडित विवाहितेचं आपल्या सासरच्या लोकांसोबत वाद सुरू होता. छोट्या छोट्या कारणातून तिचे सासरच्या मंडळींसोबत खटके उडत होते. आरोपीनं पीडितेच्या कौटुंबीक वादाचा फायदा उचलत, तिच्यावर जादूटोणा झाल्याचं सांगितलं. जादूटोणा झाल्यानेचं सासरच्या मंडळीसोबत खटके उडत आहे, तो दूर करून संसार सुरळीत करतो, असं सांगून अजीज बाबा याने पीडितेला आपल्या घरी बोलावलं. हेही वाचा-एका रात्रीचे 25 हजार; टूरिस्ट व्हिजावर भारतात आलेल्या तरुणींचा भांडाफोड 23 वर्षीय पीडित महिला अजीज बाबाच्या घरी गेली असता, आरोपीनं तिला पाण्यातून गुंगीचं औषध दिलं. तिला गुंगी येताच आरोपीनं पीडितेला विवस्त्र करत तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओज शूट केले. संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत नराधमाने तिच्यावर अत्याचार केला आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर मुख्य आरोपी अजीजचा मित्र शेख याहिया यानेही पीडितेकडं लैंगिक सुखाची मागणी केली. हेही वाचा-नागपुरातील महिलेची मध्य प्रदेशात विक्री; 16 महिन्यांनी भयावह अवस्थेत आढळली पीडित तसेच अजीज बाबा याने काढलेले सर्व फोटो आणि व्हिडीओज आरोपीनं पीडित महिलेच्या पतीला पाठवून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पीडितेनं मुख्य आरोपी अजीज बाबासोबत त्याचा मित्र शेख याहिया याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कार, जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि ब्लॅकमेलच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेख याहिया याला अटक केली आहे. मुख्य आरोपी अजीज बाबा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Nanded, Rape

    पुढील बातम्या