• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • औरंगाबाद: एकाच दिवशी तरुण-तरुणीनं संपवलं जीवन; गावच्या उपसरपंचावरच गंभीर आरोप

औरंगाबाद: एकाच दिवशी तरुण-तरुणीनं संपवलं जीवन; गावच्या उपसरपंचावरच गंभीर आरोप

Suicide in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील मालुंजा (खु) गावात एकाच दिवशी तरुण-तरुणीनं गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट (Young man and woman commits suicide) केला आहे.

 • Share this:
  औरंगाबाद, 15 नोव्हेंबर: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याच्या गंगापूर (Gangapur) तालुक्यातील मालुंजा (खु)  गावात एकाच दिवशी तरुण-तरुणीनं गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट (Young man and woman commits suicide) केला आहे. अवघ्या काही तासाच्या अंतरानं दोघांनी अशाप्रकारे आत्महत्या केल्यानं गावात खळबळ उडाली आहे. संबंधित दोन्ही आत्महत्या संशयस्पद असल्यानं पोलीस चहुबाजूने तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुलंजा गावच्या उपसरपंचाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहेत. उमेश शांताराम साळुंखे (वय-27) आणि तबसुम मुजीब शेख (18) असं आत्महत्या करणाऱ्या तरुण-तरुणीचं नाव आहे. याप्रकरणी मृत उमेश याचे वडील शांतारामा साळुंखे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात मालुंजा गावचे उपसरपंच बंडू ऊर्फ कृष्णा रावसाहेब पवार (वय-32) आणि कोमल ढवळे (वय-26) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. संबंधित दोघांकडे मृत उमेशचा अश्लील व्हिडीओ होता. संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी उमेशकडे पैशाची मागणी करत होते, यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप उमेशचे वडील शांताराम यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी उपसरपंच बंडू पवार याला ताब्यात घेतलं आहे. हेही वाचा- नांदेड हादरलं! जादूटोणा झाल्याचं सांगत तरुणीला बोलावलं घरी; नराधमाने गुंगीचं औषध पाजलं अन्... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत उमेश हा शनिवारी रात्री उशिरा गावाजवळील तुपे वस्तीवरील आपल्या शेतात झोपण्यासाठी गेला होता. रविवारी सकाळी शेतातील कांद्याच्या चाळीतील लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत उमेशचा मृतदेह आढळला आहे. उमेशच्या वडिलांनी त्याला अशा अवस्थेत मृतदेह पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला आहे. उमेशच्या आत्महत्येची बातमी गावात वाऱ्याच्या वेगानं पसरली. हेही वाचा-लातूर: एकाच झाडाला गळफास घेऊन अल्पभूधारक शेतकरी जोडप्यानं संपवली जीवनयात्रा उमेशच्या आत्महत्येची बातमी समोर आल्यानंतर, अवघ्या दोन तासांत मालुंजा गावातील 18 वर्षीय तरुणी तबसुम हिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एकाच दिवशी गावातील तरुण-तरुणीनं आत्महत्या केल्यानं गावात खळबळ उडाली आहे. पण संबंधित दोन आत्महत्येचा एकमेकांशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा अद्याप समोर आला नाही. गंगापूर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: