नितीन नांदूरकर, प्रतिनिधी अमळनेर : अचानक समोरून आले आणि बंदुकीचा धाक दाखवून हजारो रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार जळगावच्या अमळनेर तालुक्यात समोर आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. धुळे रस्त्यावरील डांगर शिवारात असणाऱ्या पांडुरंग पेट्रोल पंप वर अज्ञात एकाने बंदुकीचा धाक दाखवून सुमारे 36 हजार 500 रुपये लुटून नेले आहेत.
ही धक्कादायक घटना 24 रोजी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डांगर शिवारात असणारया पांडुरंग पेट्रोल पंपावर 24 रोजी रात्री किशोर रवींद्र पाटील हे काम करत असताना रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती पूर्ण चेहरा काळ्या रंगाच्या रुमालाने झाकून पेट्रोल पंपात घुसला. त्याच्या हातात बंदुक होती. त्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून झोपेतून उठवलं.
आली लहर केला कहर! एकटेपणाने कंटाळला, 300 मुलींना दिला धोका, प्रेमासाठी नाही तर...
बंदुकीचा धाक दाखवून जानवे शिवारातील पेट्रोल पंप लुटला, पाहा VIDEO#maharashtra #CCTV #marathinews pic.twitter.com/OKPp4zWLmv
— News18Lokmat (@News18lokmat) March 25, 2023
अज्ञान व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल-डीझेल विक्रीचे पैसे कर्मचाऱ्यांकडून हिसकावून घेतले. त्याच वेळेस एक चार चाकी चालक पेट्रोल भरण्यासाठी पंपवर आला. लुटारूने त्याच्या चारचाकी गाडीच्या डिक्कीला लाथा मारून चालकास गाडी बाहेर निघण्यास भाग पाडले. त्याला बंदुकीचा धाक दाखवीत त्याच्या कानशिलात लगावली.
ऐन जवानीमध्ये दोघांनी केलं कांड, म्हातारपणी झाली अटक, कोर्टाने पाठवलं जेलमध्ये!
चारचाकी चालकाजवळचं पाकीट हिसकावून तो फरार झाला. अज्ञात व्यक्ती आपल्या साथीदारासोबत धुळ्याच्या दिशेनं दुचाकीवरून गेला. इथे पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पेट्रोल पंपावर पैशांचा हिशोब केला असता नरेंद्र सोनसिंग पवार याच्याकडून १३ हजार २००,किशोर रविंद्र पाटील याच्याकडून १४ हजार ३०० व इंडिका कार मध्ये डीझेल टाकण्यासाठी आलेल्या संजय दिलीप भामरे याच्याकडून ९ हजार रुपये असा एकूण ३६ हजार ५०० रुपये अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून चोरून नेले आहेत. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv, Cctv footage, Crime news, Jalgaon