मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /घरात सापडला सेवानिवृत्त मोटरमनचा मृतदेह, कल्याणच्या हायप्रोफाईल सोसायटीतील धक्कादायक घटना

घरात सापडला सेवानिवृत्त मोटरमनचा मृतदेह, कल्याणच्या हायप्रोफाईल सोसायटीतील धक्कादायक घटना

कल्याणच्या हायप्रोफाईल सोसायटीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सेवानिवृत्त मोटरमनचा मृतदेह आढळला आहे. तसेच या मृतकाचे नातेवाईकही घरात जखमी अवस्थेत आढळले आहेत.

कल्याणच्या हायप्रोफाईल सोसायटीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सेवानिवृत्त मोटरमनचा मृतदेह आढळला आहे. तसेच या मृतकाचे नातेवाईकही घरात जखमी अवस्थेत आढळले आहेत.

कल्याणच्या हायप्रोफाईल सोसायटीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सेवानिवृत्त मोटरमनचा मृतदेह आढळला आहे. तसेच या मृतकाचे नातेवाईकही घरात जखमी अवस्थेत आढळले आहेत.

ठाणे, 12 डिसेंबर : कल्याणमध्ये (Kalyan) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिकनघर भागातील निखिल हाईट्स या हाय प्रोफाईल (high profile) सोसायटीत एका घरात 55 वर्षीय सेवानिवृत्त मोटरमनचा मृतदेह (dead body) आढळला आहे. धक्कादायक म्हणजे त्याचवेळी घरात या मयत व्यक्तीची पत्नी आणि मुलगा गंभीररित्या जखमी अवस्थेत पडलेले होते. त्यामुळे नक्की ही हत्या आहे की आणखी काही? याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

नेमकं प्रकरण काय?

मृतक व्यक्तीचं नाव प्रमोद बनोरिया असं आहे. त्यांची पत्नी कुसुम आणि मुलगा लोकेश हे दोघे गंभीर जखमी आहेत. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. कल्याण महात्मा फुले पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत. कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात निखिल हाईट्स ही हाय प्रोफाइल सोसायटी आहे. या सोसायटी रहिवाशांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना एक घटनेबाबत माहिती दिली. घटना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा : महिलेचा निर्वस्त्र शीर नसलेला मृतदेह, माथेरानमधील खळबळजनक घटना

पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि...

पोलीस अधिकारी प्रदीप पाटील आपल्या पथकासोबत इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पोहचले असता घरात एक तरुण जखमी अवस्थेत आढळला. पोलिसांनी घरात जाऊन पाहिले असता आणखी एक महिला जखमी अवस्थेत होती. तर एक इसमाचा मृतदेह आढळला. घरात सर्वत्र रक्त पसरले होते. ही घटना रात्री घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. लोकेश याने वडिलांनी आम्हाला जखमी केलं. त्यांनंतर स्वतःला संपवून टाकलं, असं पोलिसांना सांगितलं आहे.

हेही वाचा : लग्न करण्यासाठी पळून जातानाच दुचाकीला अपघात; प्रेयसीचा भयावह अंत, प्रियकर गंभीर

घटना उघडकीस कशी आली?

दरम्यान, लोकेशने वॉचमनला फोन करुन रुग्णवाहिका पाहिजे म्हणून फोन केला. मात्र वॉचमनला संशय आल्याने त्यांनी सोसायटीच्या सदस्यांना सांगितलं. सदस्यांनी घरी जाऊन पाहिलं असता त्यांना धक्काच बसला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. कल्याण डीसीपी सचिन गुंजाळ आणि एसीपी उमेश माने पाटील घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र तपासाअंती या प्रकरणातील तथ्य आणि काय घटना घडली हे समोर येणार आहे. या प्रकरणाच्या तपास सुरु आहे. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची चौकशी झाल्यानंतर सत्य समोर येईल, असं एसीपी उमेश माने पाटील यांनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Crime