मराठी बातम्या /बातम्या /देश /लग्न करण्यासाठी पळून जातानाच दुचाकीला अपघात; प्रेयसीचा भयावह अंत, प्रियकर गंभीर

लग्न करण्यासाठी पळून जातानाच दुचाकीला अपघात; प्रेयसीचा भयावह अंत, प्रियकर गंभीर

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime News: प्रेमविवाहासाठी आई-वडिलांनी नकार दिल्यानंतर, पळून जाऊन लग्न करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका प्रेमीयुगुलाच्या दुचाकीला भीषण अपघात (Bike terrible accident) झाला आहे.

लखनऊ, 12 डिसेंबर: प्रेमविवाहासाठी आई वडिलांनी नकार दिल्यानंतर, पळून जाऊन लग्न करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका प्रेमीयुगुलाच्या दुचाकीला भीषण अपघात (Bike terrible accident) झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, प्रेयसीचा जागीच अंत (Girlfriend died) झाला आहे. तर प्रियकर तरुणही गंभीर जखमी (Boyfriend injured) झाला असून एका स्थानिक रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जात आहेत. मात्र प्रियकर तरुणाने प्रेयसीवर बलात्कार करून तिची हत्या (rape on girlfriend and murder) केल्याचा आरोपी तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रियकराविरोधात गुन्ह दाखल (FIR lodged)केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित घटना उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्याच्या जेहानाबाद येथील आहे. याच शहरात राहणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थिनीचं शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करायचं होतं. पण मुलाच्या कुटुंबीयांनी या लग्नाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळी प्रियकराने प्रेयसीला भेटायला  बोलावलं आणि लग्न करण्याच्या हेतून तिला पळवून नेलं.

हेही वाचा-'10लाख मागितले तर कोंबडा बनवेल' अघोरी विद्या असल्याचं सांगून फसवणूक, भोंदूला अटक

पण लग्न करण्यासाठी पळून जात असताना पिलीभीत जिल्ह्यातील गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलातील एका झाडाला दुचाकी आदळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात प्रेयसी तरुणीचा जागीच अंत झाला आहे. तर प्रियकर तरुण गंभीर जखमी झाला आहे. संबंधित जखमी तरुणावर पिलीभीत येथील जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच तरुणीच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात जाऊन गोंधळ घातला आहे. तसेच प्रियकर तरुणाने प्रेयसीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

हेही वाचा-औरंगाबाद: पेढा खाताच हरपली शुद्ध; शेजारच्या तरुणाचं विवाहितेसोबत विकृत कृत्य

मृत तरुणीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकर तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच मृत तरुणीच्या मृतदेहाची व्हिडीओग्राफी करत शवविच्छेदन केलं जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Uttar pradesh